जळगाव मिरर / २३ एप्रिल २०२३ ।
राज्यातील ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी जळगावात दाखल झाले आहे. पाचोरा येथे होणाऱ्या सभेकडे जनतेसह विरोधकांचे लक्ष लागून आहे. यात जिल्ह्यातील मंत्र्यासह आमदारांविरोधात ठाकरे गटाचे नेते यांच्यात सुरु असलेले आरोप प्रत्यारोप सुरु आहे. या प्रचारसभेपूर्वीच पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तुफान टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या आजच्या सभेला २५ हजारापेक्षा अधिक लोक जमणार नाहीत. उद्धव ठाकरे यांच्याकडे बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी जादू नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरे म्हणतात माझा बाप चोरला… माझा बाप चोरला… अरे बाबा तुमचा बाप चोरला गेला असेल पोलिसात तक्रार द्या; अशी खोचक टीका किशोर पाटील यांनी केली आहे.
पाचोऱ्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. उद्धव ठाकरे यांची आजची सभा माझ्याविरोधा नाही. ही सभा माझ्याविरोधात नसून माझे काका, माझ्या राजकीय गुरुच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी आहे. माझ्या विरोधातील सभा असेल तर माझी प्रतिक्रिया वेगळी असेल. आज ते माझ्या काकांच्या पुतळ्याच्या लोकार्पणासाठी येत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांचं मी स्वागत करेल. या सभेला कोणताही गालबोट लागणार नाही, असं किशोर पाटील यांनी स्पष्ट केलं.