जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२४
आपल्या भारत देशाला कृषिप्रधान देश म्हणून संबोधले जाते परंतु सत्ताधारी हे कृषी क्षेत्राकडे आणि शेतकरी, कष्टकरी बांधवांकडे दुर्लक्ष करत आहेत जिल्ह्यात शेतकरी बांधवांचे पिक विमा, अतिवृष्टी अनुदान, प्रोत्साहनपर अनुदान,घरकुल योजना अनुदानाचे थकीत हप्ते ,शेतीच्या विजेचा प्रश्न व इतर प्रश्नांमुळे शेतकरी बांधव मेटाकुटीला आले आहेत शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून कुंभकर्णी झोपेत असलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडी तर्फ़े मुक्ताईनगर तहसील कार्यालय येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाच्या सुरुवातीला नांगर आणि बैलगाडीचे पुजन करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली त्यानंतर प्रमुख मागण्यांचे मुक्ताईनगर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले निवेदनात
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे, पंचनामे झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळावी. तसेच ओला दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी.
नियमित कर्ज फेड करणा-या सर्व शेतकरी बांधवांचे प्रोत्साहन अनुदान तात्काळ मिळावे. शेतातील वीज पंपाचे १५ HP पर्यंतचे विजबिल माफ करावे. शेतकऱ्यांचं पांढरं सोनं कापूस ह्या पिकला १२ हजार रुपये प्रमाणे हमीभाव मिळावा. केळी, ज्वारी, मका, आदी शेती पिकांना हमखास हमी भाव मिळावा. केळी आणि इतर पिकांसाठी मागील वर्षी न मिळालेली पीक विम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांना मिळावी.केळी, सोयाबीन, कापूस व इतर पिक उत्पादक शेतक-याना पिक विमा मिळण्यासाठीच्या जाचक अटी कमी करुन सरसकट शेतकऱ्यांना पिक विम्याची रक्कम तात्काळ द्या.रासायनिक खते, औषधे, बी-बियाणे यांचे दर कमी करून त्यावरील संपूर्ण GST रद्द करावा.
बंद केलेली पोकरा योजना तात्काळ सुरु करावी.रखडलेले ठीबक सिंचन तुषार सिंचन चे अनुदान तात्काळ द्या. महा डिबीडी वर अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत प्रक्रिया पूर्ण करुन पुर्वसंमत्या द्या. चक्रीवादळामुळे शेतातील पडलेले विजेचे पोल व डी.पी.तात्काळ सुरु करा.दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. शेतक-यांना जल-सिंचनासाठी (विहीर, बोअरवेल) अनुदान मिळावे.
महिला आणि मुलींवर अत्याचाराच्या घटना घडू नये या करिता पोलीस यंत्रणा अधिक मजबूत आणि सुसज्ज करावी. जल जीवन मिशन योजना अद्याप एकही पूर्ण झालेली नाही, ती लवकरात लवकर पूर्ण करून सुरु करावी. मोदी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना , शबरी आवास योजना व रमाई आवास योजनेत सुरु असलेल्या घरकुलांची रक्कम तात्काळ अदा करा तसेच सदर अनुदान वाढवून द्या . संजय गांधी निराधार , इंदिरा गांधी निराधार श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे सहा महिन्यापासून न मिळालेले लवकरात लवकर वितरीत करावे व नवीन प्रकरणे मंजूर करावीत. अशा शेतकरी बांधवांच्या हिताच्या मागण्या निवेदना द्वारे शासन प्रतिनिधी म्हणून तहसीलदार यांचेकडे करण्यात आल्या व त्या लवकरात लवकर सोडविण्यात याव्यात अन्यथा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडी तर्फे तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी रोहिणी खडसे म्हणाल्या शेती क्षेत्राचा आपल्या देशाच्या सकल उत्पादनात मोठा वाटा आहे. रोजगार निर्मिती करण्यात शेती व्यवसाय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. परंतु सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे आणि सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे शेती कसने अत्यंत जिकरीचे झाले आहे नफा तर दूरच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघण्याची शाश्वती राहिलेली नाही तरी सरकार शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासना नुसार शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देत नाही उलट शेती साठी लागणाऱ्या बि बियाणे कीटकनाशके व इतर साहित्यावर जि एस टी लावून त्यांच्या किमती वाढवल्या आहेत त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत झोपेचे सोंग घेतलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्यासाठी हे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले
शेतकऱ्यांचे पिक विमा, कर्जमाफी योजनेतील प्रोत्साहन पर अनुदान, अतिवृष्टी अनुदान, घरकुलांचे थकलेले हप्ते असे अनेक प्रश्न आहेत परंतु सत्ताधारी आश्वसन देऊनही ते सोडवत नाही
शेतकऱ्यांना आपण बळीराजा म्हणून संबोधतो पण सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी आत्महत्या करून बळी जात आहे वारंवार शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दिड पट हमीभावाचे आश्वासन देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे , शेतमाल निर्यातीवर बंदी घातली जात आहे त्यामुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने उत्पादन खर्च निघत नाही त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे गेल्या काही वर्षांत मजुरांचा प्रचंड तुटवडा, वाढती मजुरी, मशागतीचा वाढता खर्च, इंधन दरवाढ, कृषी निविष्ठांचे वाढते दर शेती क्षेत्राला चिंता करायला लावणारे आहेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी आणि दीडपट हमीभाव देण्यात यावा तेव्हाच शेतकरी टिकेल शेतकरी टिकला तरच शेती टिकेल शेती टिकली तरच देशाची अर्थव्यवस्था टिकेल म्हणून झोपेचं सोंग घेतलेल्या सत्ताधाऱ्यांनी जागे होऊन शेतकरी कष्टकरी बांधवांचे प्रश्न सोडवावेत. अन्यथा भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडी तर्फ़े तीव्र आंदोलन करण्यात येईल असे रोहिणी खडसे यांनी सांगितले
यावेळी बाजार समिती सभापती सुधीर तराळ, निवृत्ती पाटिल, विलास धायडे, ईश्वर रहाणे, राजेंद्र माळी, बबलू सापधरे,डॉ बि सी महाजन, रामभाऊ पाटिल, किशोर चौधरी,दिपक पाटिल, नंदकिशोर हिरोळे,बापू ससाणे,शकील सर, मस्तान कुरेशी,शाहिद खान,लता ताई सावकारे, बुलेस्ट्रीन भोसले,विशाल रोटे,प्रविण कांडेलकर, रविंद्र दांडगे,प्रेमचंद बढे, वासुदेव बढे, माणिक पाटिल आणि पदाधिकारी उपस्थित होते