मेष : आर्थिक गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्या. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यातही तुमचे विशेष योगदान असेल. जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळेल. सार्वजनिक ठिकाणी वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते, थोडा वेळ ध्यान आणि चिंतनात व्यतित करा. घरातील ज्येष्ठांचा सन्मान राखा.
वृषभ : आज आत्मविश्वासाने आव्हानात्मक परिस्थितीचा सामना कराल. कोणतेही सरकारी प्रलंबित काम मार्गी लागले. आर्थिक व्यवहार करू नका. मुलांच्या समस्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. कर्मावर विश्वास ठेवून तुमची वाटचाल सुरु ठेवा. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव कायम राहील.
मिथुन : काही महत्त्वाचे कौटुंबिक निर्णय घ्याल. तरुणांना परीक्षेत सकारात्मक परिणाम मिळू शकतात. कोणत्याही प्रकारचे नुकसान होण्याचा धोका असल्याने हिशेब काळजीपूर्वक करा. त्याशिवाय कोणाशीही वाद घालू नका. राजकीय बाबतीत येणाऱ्या अडचणी दूर होतील. व्यवसायात आज दिवसभर व्यस्त राहाल.
कर्क : ग्रहांची स्थिती चांगली होत आहे. आर्थिक नियोजनाशी संबंधित कोणतेही उद्दिष्ट सहज पूर्ण होईल. धार्मिक संस्थांमध्ये तुमचे निस्वार्थ योगदान तुमची प्रतिष्ठा वाढवेल. कोणत्याही नकारात्मक परिस्थितीचा शांतपणे सामना करा. राग आणि आक्रमकतेमुळे परिस्थिती आणखी बिघडू शकते. मुलांना प्रवेशाच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. व्यवसायात स्वत: निर्णयावर ठाम राहा.
सिंह : आज तुमच्या प्रतिभेला चालना मिळेल. घरामध्ये काही बदल करण्याबाबत विचार करत असाल तर ही वेळ योग्य आहे. गोष्टींचे नियम पाळा. कोणत्याही प्रकारचा प्रवास टाळा. तरुणांनी नकारात्मक आणि चुकीच्या कामांपासून दूर राहावे. व्यवसायात अडचणी येऊ शकतात. घरात प्रसन्न वातावरण राहू शकते.
कन्या : मित्रांसोबत कौटुंबिक सलोखा राहील. मुलांचे प्रश्न एकमेकांशी सल्लामसलत करून सोडवता येतील. विद्यार्थी आणि तरुणांनी आपल्या करिअरबाबत बेफिकीर राहू नये. ज्येष्ठांच्या मदतीने भावंडांसोबतचे वाद मिटवता येतील. कामाच्या ठिकाणी केलेले बदल सकारात्मक परिणाम देऊ शकतात. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद आणि आपुलकीमुळे कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
तूळ : तुमच्यासाठी सकारात्मक बदलांची वेळ येत आहे. काही अडचणीच्या वेळी नातेवाईकांचा पाठिंबा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. सततच्या धावपळीतून थोडा आराम मिळेल. उत्पन्नाचे स्रोत कमी होतील;पण लवकरच परिस्थिती अनुकूल होईल. तुमची ऊर्जा आणि तुमचे संपर्कक्षेत्र विस्तारण्यावर भर द्या.
वृश्चिक : आज तुम्हाला तुमच्या कोणत्याही राजनैतिक संपर्काचा फायदा होऊ शकतो. कौटुंबिक आणि व्यवसायाच्या जबाबदाऱ्या तुम्ही योग्यरित्या हाताळू शकाल. तुमच्या मनात संशयाची भावना नातेसंबंध खराब करू शकते. त्यामुळे वेळेनुसार आपल्या वागण्यात बदल घडवून आणणे गरजेचे आहे. माध्यम, कला, प्रकाशन क्षेत्रातील संबंधितांना चांगले यश लाभेल.
धनु : दिवसाच्या सुरुवातीपासूनच तुमच्या महत्त्वाच्या कामांचे नियोजन सुरू करा. पैशाशी संबंधित काही गुंतवणूक योजना तयार होतील. तुमच्या घाई आणि निष्काळजीपणामुळे काही नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा.व्यवहारात लवचिक राहा. जोडपे एकमेकांशी संवेदनशीलतेने वागतील. थकवा आणि नकारात्मकतेमुळे मनोबल कमी होऊ शकते.
मकर : सामाजिक आणि कौटुंबिक कार्यात तुमचे महत्त्वपूर्ण योगदान असेल. शांततेसाठी थोडा वेळ एकांत किंवा धार्मिक स्थळी घालवणे देखील आवश्यक आहे. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना योग्य विचारमंथन आवश्यक आहे. दस्तऐवज वाचल्याशिवाय कोणतीही कारवाई न करणे चांगले. व्यवसायाशी संबंधित योजना यशस्वी होतील.
कुंभ : घराशी संबंधित जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीवर वेळ जाईल. तुमची सकारात्मक आणि आश्वासक वृत्ती तुम्हाला समाजात आणि कुटुंबात आदर देईल. युवकांना आपल्या ध्येयासाठी कठोर परिश्रम केले तर यश नक्कीच मिळेल. कोणतेही काम करताना बजेट लक्षात ठेवणे गरजेचे आहे. विनाकारण इतरांच्या कामात ढवळाढवळ करू नका.
मीन : ध्येयपूर्ती होईल. एखादे महत्त्वाचे कार्य पूर्ण केल्याने मनशांती लाभेल. एखाद्याच्या नकारात्मक कृतीमुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या असुरक्षित होऊ शकता. त्यामुळे इतरांपासून अंतर ठेवा. कामाच्या पद्धतीत बदल सकारात्मक राहील. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी कुटुंबासोबत थोडा वेळ व्यतित करा. ताणतणावापासून टाळा.