जळगाव मिरर | २९ जुलै २०२४
दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात कुठल्या ना कुठल्या वस्तूचे दर कमी अधिक होत असतात. जुलै महिना संपण्यात आला असून येत्या दोन दिवसात ऑगस्ट महिन्याची सुरुवात होणार आहे. त्यासाठीच सर्वसामान्यांसाठी हि महत्वाची बातमी ठरणार आहे. 1 ऑगस्ट 2024 पासून नागरिकांच्या खिशावर ताण पडणार आहे. चला जाणून घेवूया 1 ऑगस्टपासून कोणते बदल होणार आहेत.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला गॅस सिलिंडरचे दर निश्चित केले जातात. गेल्या महिन्यात सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी केल्या होत्या. त्यानुसार आता पुन्हा 1 ऑगस्ट रोजी व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती निश्चित केल्या जातील. यावेळीही सरकार गॅस सिलिंडरचे दर कमी करते की त्यात वाढ होते याकडे लक्ष लागून आहे.
ऑगस्टमध्ये होणाऱ्या बदलानुसार, 50,000 रुपयां पेक्षा कमी व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. तर 50,000 वरील व्यवहारांवर शुल्क आकरण्यात येणार आहे. संपूर्ण रकमेवर 1 टक्का शुल्क आकारले जाईल जो प्रति व्यवहार 3000 पर्यंत मर्यादित असेल. तर तुम्ही MobiKwik, CRED इत्यादी थर्ड पार्टी ॲप्स वापरून पेमेंट केले तर तुम्हाला 1 टक्के शुल्क भरावे लागेल. प्रति व्यवहार मर्यादा 3000 रुपये आहे. त्याचप्रमाणे थर्ड ॲप्सद्वारे 5000 रुपयांपेक्षा जास्त पैसे भरल्यास 1 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ शकते. यासह क्रेडिट कार्डद्वारे उशिरा पेमेंट, वीजबिल, भाडे आणि इतर उपयुक्तता व्यवहारांच्या नियमांमध्ये बदल करण्यात आले होते. नियमानुसार, महाविद्यालय किंवा शाळेच्या वेबसाइटद्वारे थेट पैसे भरण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
भारतात गुगल मॅपने देखील काही नियमात बदल केले असून हे बदल 1 ऑगस्टपासून लागू होणार आहेत. त्यानुसार, कंपनीने आपल्या सेवांचे शुल्क 70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. याशिवाय Google Maps या सेवेसाठी डॉलरऐवजी भारतीय रुपयांमध्ये शुल्क आकारणार आहे.
1 ऑगस्ट 2024 पासून HDFC बँकेकडून Tata New Infinity आणि Tata New Plus क्रेडिट कार्ड्समध्ये बदल होतील. या कार्डधारकांना टाटा न्यू यूपीआय आयडी वापरून व्यवहारांवर 1.5 टक्के न्यूकॉईन्स मिळतील.
नवीन नियमांनुसार, उशीरा पेमेंट टाळण्यासाठी सुलभ हप्त्यांची सुविधा देखील उपलब्ध होईल. मात्र, यासाठी ग्राहकांना 299 रुपयांपर्यंतचे ईएमआय प्रोसेसिंग चार्ज द्यावा लागेल. एचडीएफसी बँकेच्या मते, हे शुल्क जीएसटी अंतर्गत आहे. तुम्ही या बँकेतूनही थर्ड पार्टी पेमेंट ॲपद्वारे पेमेंट केल्यास, तुम्हाला प्रत्येक व्यवहारासाठी 1 टक्के शुल्क द्यावे लागेल.