मेष : आज आव्हानात्मक परिस्थितीला कठोर परिश्रमाद्वारे सक्षमपणे तोंड द्याल. तुमच्या कामाचे कौतुक होईल. भविष्यातील योजनांबाबत कुटुंबाशी चर्चा होऊ शकते. आर्थिक बाबतीत मतभेद होऊ शकतात. व्यवसायातील कामे मंद राहतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रकृतीची काळजी घ्या.
वृषभ : आज काळ अनुकूल राहील. नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात राहाल. विद्यार्थी आपले ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक अन्यथा आर्थिक अडचणी येतील. कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील.
मिथुन : आजचा दिवस खूप व्यस्त असेल. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक दृष्टीकोनातून विचार करुन कामे पूर्ण करा. उधार दिलेले पैसे परत मिळण्यासाठी योग्य वेळ आहे. भूतकाळातील चुका उगळत बसू नका. व्यवसायातील बाबींचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. जोडीदार आणि कुटुंबातील लोकांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. आरोग्य चांगले राहील.
कर्क : सध्याच्या दिनचर्येशी जुळवून घेण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला यामध्ये यशही मिळेल. कोणतीही चांगली बातमी मिळाल्याने घरात आनंदाचे वातावरण राहील. नवीन माहिती मिळवण्यात वेळ जाईल. घरातील कोणतीही समस्या शांततेने सोडवण्याचा प्रयत्न कराल. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. नकारात्मक विचारांमुळे नैराश्य जाणवू शकते.
सिंह : तुम्ही तुमच्या मेहनतीने परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल बनवाल. मेहनतीचे योग्य फळही तुम्हाला मिळेल. गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये घाई करू नका. धार्मिक कार्यात तुमचे योगदान असेल. जवळच्या नातेवाईकांसोबत वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेशी संबंधित कोणताही वाद वाढू शकतो. कोणताही निर्णय घेताना मन स्थिर ठेवा. आरोग्य उत्तम राहील.
कन्या : महिलांसाठी आजचा दिवस विशेषतः अनुकूल असेल. मालमत्तेशी संबंधित कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा होऊ शकते. कोणताही महत्त्वाचा निर्णय भावनिक होऊन घेऊ नका. वैवाहिक संबंध मधुर होतील.
तूळ : आज तुम्ही नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध दृष्टिकोनातून अनेक गोष्टी व्यवस्थितपणे करू शकाल. राजकीय संबंध दृढ होतील आणि लाभदायकही होतील. मुलांच्या करिअरशी संबंधित कोणत्याही समस्येवर उपाय शोधल्यास मोठा दिलासा मिळेल. तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा आणि नैराश्य येऊ शकते. घरातील वातावरण प्रसन्न राहील.
वृश्चिक : आज दिवसाचा बहुतांश वेळ आध्यात्मिक कार्यात व्यतित केल्याने मानसिक शांतीही मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राखण्यात तुमची विशेष भूमिका असेल. कोणत्याही विशेष विषयावर चर्चा होईल. मुलांवर जास्त नियंत्रण ठेवू नका. त्यांच्याशी मैत्रीपूर्ण वागण्याने त्यांचे मनोबल वाढेल. जुनी मैत्री प्रेमाच्या नात्यात बदलू शकते.
धनु : कुटुंबातील सदस्याच्या लग्नाबाबतही चर्चा होऊ शकते. बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कुटुंबात ढवळाढवळ करू देऊ नका. काहीवेळा तुमचा अतिआत्मविश्वास तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. वैयक्तिक कामांमध्ये व्यस्त राहिल्यामुळे व्यवसायाशी संबंधित कामांकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता. आरोग्य उत्तम राहील.
मकर : आज तुम्ही बहुतांश वेळ वैयक्तिक आणि आवडीच्या कामात व्यतित कराल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संतुलन राखाल. नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींशी संबंधित अप्रिय घटनेमुळे मनात निराशा वाटेल. तुमचं संपर्कक्षेत्र मजबूत कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
कुंभ : आज सामाजिक सेवा संस्थेबद्दल सहकार्याची भावना दृढ होईल. यामुळे तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक शांती मिळेल. जवळचा नातेवाईक किंवा मित्र ईर्षेमुळे तुमची छाप खराब करण्याचा प्रयत्न करू शकतो. व्यवसायात आर्थिक बाबींचा अधिक विचार करावा लागेल.
मीन : आज जवळच्या नातेवाईकाशी एखाद्या महत्त्वपूर्ण विषयावर सकारात्मक चर्चा होईल. इमारत बांधकामाशी संबंधित रखडलेले काम आज मार्गी लागू शकते. गैरसमजामुळे मनात शंका किंवा निराशेची स्थिती राहील. कार्यक्षेत्रात अधिक दूरदृष्टीने काम करण्याची गरज आहे.