जळगाव मिरर / ३० मार्च २०२३ ।
सध्या सोशल मिडीयावर अनेक लहान मुले व्हिडीओ बघत असतात त्यातच अनेक व्हिडीओ हे लहान मुलांना सावधान करणारे असतात. त्यातील काही मुल अशी व्हिडीओ बघून खरच खूप मोठा काम करून टाकतात व मोठ्यांना देखील लाजवून सोडत असतात अशीच घटना जळगाव शहरात घडली आहे. १० वर्षाची मुलगी भरदुपारी घरी असतांना काही अनोळखी दरोडेखोराने दर ठोकवत पाणी मागत धमकी दिल्याने लहान मुलीने धाडस दाखवीत त्या दरोडोखोराना पळवून लावले आहे.
काय घडली घटना ?
शहरातील मुक्ताईनगर परिसरातील एसएमआयटी कॉलेजजवळ राहणाऱ्या वकिलाच्या घरी भरदुपारी काही संशयित आरोपींनी दरोडाच्या उद्देशाने येऊन वकिलाच्या १० वर्षाच्या मुलीवर दरवाजा उघडण्यासाठी दबाव टाकला. मात्र संशयित आरोपींना अजिबात न भिता या दहा वर्षाच्या मुलीने दरवाजा न उघडून आरोपींना हिमतीने परतवून लावले. याबाबत बुधवारी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आली आहे.
मिळालेली माहिती अशी कि, सचिन देविदास पाटील (वय-४३) यांनी याबाबत जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रात्री १० वाजेच्या सुमारास तक्रार दाखल केली आहे. बुधवारी २९ मार्च रोजी दुपारी २ वाजता त्यांची १० वर्षांची मुलगी शृंगी ही घरात एकटी होती. तेव्हा काही अज्ञात दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घरासमोर आले. त्यातील एकाने वकिलांच्या दारासमोर जात दरवाजा वाजविला. तेव्हा सेफ्टी डोअर लावलेला असल्याने लहानग्या शृंगीने साधा दरवाजा उघडला. संशयित दरोडेखोर म्हणाला, मला पाणी पाज, नाहीतर मी दरवाजा तोडून आत घुसेल. मात्र शृंगीने हिम्मत दाखवून दरवाजा अजिबात उघडला नाही. अखेरपर्यंत दरवाजा न उघडल्यामुळे दरोडेखोर तिथून निघून गेले. संध्याकाळी जेव्हा वकील सचिन पाटील घरात आले, तेव्हा त्यांना त्यांच्या मुलीने घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठून तेथे तक्रार नोंदवली.
