• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात शेतकऱ्यासह निवृत्त लिपिकाला लाखो रुपयात फसविले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 9, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ९ डिसेंबर २०२४

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास नफ्याचे अमिष दाखवून शेतकऱ्याची ४२ लाख १५ हजार रुपयांमध्ये तर निवृत्त लिपिकाला खोटे कागदपत्र पाठवून गुन्हा दाखल करण्याची धमकी देत १८ लाखात गंडविले. ही घटना शनिवारी उघडकीस आल्यानंतर संबंधितांनी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार ऑनलाईन ठगांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील एका परिसरात ६५ वर्षीय शेतकरी वास्तव्यास आहे. त्यांच्यासोबत एका संशयिताने दि. १३ ऑक्टोबर ते दि. ७ डिसेंबर या दरम्यान संपर्क साधला. तसेच एका अॅप्लीके शनद्वारे ट्रेडिंग प्लॅटफॉर्ममध्ये शेतकऱ्याची वैयक्तिक माहिती भरून घेतली. त्यानंतर त्यांना एका ग्रुपमध्ये देखील अॅड केले. त्यात त्यांना शेअर ट्रेडिंगविषयी माहिती देऊन त्याद्वारे अधिक नफ्याचे अमिष दाखविले. सुरुवातीला पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर सहा लाख रुपये नफा देण्यात आला. गुंतवलेल्या रकमेच्या दुपटीपेक्षा अधिक नफा मिळत असल्याने शेतकरी हे त्यामध्ये अधिक गुंतवणूक करीत गेले.

गुंतवलेल्या रकमेवर त्यांना परतावा मिळत नव्हता. असे करता-करता वेळोवेळी शेतकऱ्याने एकूण ४२ लाख १५ हजार रुपये समोरील व्यक्तीच्या बँक खात्यात आरटीजीएस व एनईएफटीद्वारे भरले. मात्र नंतर त्यांना नफा तर दूरच मुद्दल रक्कमही परत मिळत नसल्याने त्यांना आपली फसवणुक झाल्याची खात्री झाली. सायबर ठगांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्याने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून रिथिका देवी नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या घटनेत एका शिक्षण संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यासोबत दि. १९ ते दि. २५ नोव्हेंबरदरम्यान राहुल गुप्ता व त्याचा असिस्टंट संदीप राव असे नाव सांगणाऱ्यांनी संपर्क साधला. त्यांना न्यायालयाची खोटी ऑर्डर व खोटे कादगपत्र त्यांच्या व्हॉटसअॅपवर पाठवून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यामुळे घाबरलेल्या निवृत्त कर्मचाऱ्याकडे समोरील व्यक्तींनी पैशांची मागणी केली. दरम्यान, त्यांनी वेळोवेळी सुमारे १८ लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठविले. समोरील व्यक्तींनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित निवृत्ताने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दि. ७ डिसेंबर रोजी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश गायकवाड करीत आहेत.

Related Posts

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !
क्राईम

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा
क्राईम

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026
जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू
क्राईम

जळगाव जिल्ह्यात १५ ते २९ मेदरम्यान प्रतिबंधात्मक आदेश लागू

May 15, 2026
जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी : जागतिक अनिश्चिततेतही महसूल, EBITDA आणि रोख निर्मितीत उल्लेखनीय वाढ

May 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“खरीप हंगामासाठी सर्व विभागांनी मिशन मोडवर कामे करावी” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

शिवसेना – उ.बा.ठा युवासेना महानगर युवाधिकारीपदी प्रितम शिंदे नियुक्त !

May 16, 2026
आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

आईला शेवटचा कॉल, तरुणाने संपविले आयुष्य : प्रेम प्रकरणाची चर्चा

May 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

माणुसकीला काळीमा : धरणगावातील नराधम मुख्याध्यापकाचा चौथीच्या चिमुरडीवर अत्याचार !

May 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group