जळगाव मिरर । ६ फेब्रुवारी २०२३।
जळगाव शहरातील निसर्गरम्य ठिकाण असलेल्या मेहरूण ट्रकवर तरुणास चाकूचा धाक दाखवीत लुटल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात दोघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील जोशी पेठ परिसरातील रहिवासी संकेत सुनील माळी (वय १९) हा शनिवार दि ४ रोजी दुपारच्या सुमारास मेहरूण ट्रकवर आपल्या दुचाकीवर बसलेला असताना त्याच्या जवळ दोन अनोळखी व्यक्ती काळ्या रंगाच्या दुचाकीवर येत त्याला चाकुचा धाक दाखवीत गळ्यातील सोन्याची चैन व कानातील सोन्याची बाळी असा एकूण ४२ हजार रुपयांचे ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी संकेत माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात दोन अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउनी रविद्र गिरासे हे करीत आहेत.