जळगाव मिरर | २२ मे २०२३
जळगाव शहरातील नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या वतीने दिनांक २१ रोजी मतिमंद मुलांचे आश्रय माझे घर सावखेडा शिवार या ठिकाणी नारीशक्ती बहुद्देशीय संस्थेच्या अध्यक्ष मनीषा पाटील व किशोर पाटील यांच्यासह कुटुंब नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या पदाधिकारी यांच्या समवेत आश्रय माझे घर या ठिकाणी मतिमंद मुलांसाठी सौ मनीषा किशोर पाटील यांनी आपला आनंद केक कापून व लाडू वाटप करून आनंद वाटला.

याप्रसंगी त्यांनी या मुलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अस म्हणतात की मुलं ही देवाघरची फुलं आणि लहान मुले प्रिय असलेल्या ह्या दांपत्याने मुलांचे तोंड गोड लाडू वाटप करून केलें तसेच सर्व भविष्यातही या मुलांना फळ खायला मिळतील अशा सुंदर विचारांनी फळ झाडांचे लागवड आपले पती व संस्थेच्या पदाधिकारी तसेच कुटुंबासह केली याप्रसंगी संस्थेच्या पदाधिकारी सौ नूतन तास खेडकर, मरियम बुगडवाला, किमया पाटील, रेणुका हींगु नेहा जगताप, हर्षा गुजराती, राधिका पाटील, श्रावणी पाटील, शरयू पाटील, योगेश पाटील हे उपस्थित होते.




















