• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

सासरच्यांनी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं ; संतापलेल्या बापाने दोघांना संपवलं !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 26, 2025
in क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
सासरच्यांनी प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं ; संतापलेल्या बापाने दोघांना संपवलं !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ ऑगस्ट २०२५

राज्यातील अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणामुळे गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना आता नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यातील गोळेगाव येथे एक विवाहित तरुणी आणि तिच्या प्रियकरास सासरच्या मंडळींनी आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. ही बाब माहेरच्यांना कळवत तरुणीसह प्रियकरास घेऊन जाण्यास सांगितले. तरुणीच्या वडिलांनी मुलगी आणि तिच्या प्रियकराला गावी घेऊन जात असल्याचे सांगून वाटेतील करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. या घटनेतील तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला असून प्रियकराचा मृतदेह विहीरीजवळच सापडला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मुलीचे आजोबा, वडील आणि काका यांना अटक करण्यात आली. तसेच सासरच्या मंडळीना देखील पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात मुलगा आणि तिचा प्रियकर या दोघांचे शवविच्छेदन सुरू होते. घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, उमरी तालुक्यातील बोरजुनी येथील संजीवनी कमळे या तरुणीचा गतवर्षी गोळेगाव येथील युवकासोबत विवाह झाला होता. मात्र संजीवनीचे गावातीलच लखन बालाजी भेंडारे या युवकासोबत प्रेम संबंध होते. हे प्रेमसंबंध लग्नानंतरही कायम असल्याने याबाबत तरुणीच्या वडिलांनी लखन भंडारे यास हे संबंध थांबविण्याबाबत वारंवार समजावून सांगितले होते. तरीही तरुणीचा प्रियकर लखन हा सोमवारी तिच्या सासरी गोळेगाव येथे भेटायला गेला होता. ते दोघे गोळेगाव येथील एका घरामध्ये आक्षेपार्ह अवस्थेत सापडले. तरुणीच्या सासरच्या मंडळींनी त्यांना रंगेहाथ पकडून बांधून ठेवले.

हा सर्व प्रकार तरुणीच्या माहेरी कळविण्यात आला. त्यावेळी तरुणीचे वडील मारुती सुरणे व इतर दोघेजण गोळेगावला पोहोचले. सासरच्या मंडळींनी घडलेला प्रकार संजीवनीच्या वडिलांना सांगितला आणि आपली मुलगी घेऊन जा, असे सांगितले. त्यावेळी वडील सुरणे व इतर नातेवाईकांनी तरुणी आणि तिच्या प्रियकरास गावाकडे नेत असल्याचे सांगून गोळेगावहून निघाले. करकाळा मार्ग ते पायी बोरुजुनीला जात होते. वाटेत झालेल्या प्रकारचा संताप आल्याने वडिलांनी व इतर नातेवाईकांनी संजीवनीचे हात पाय बांधून करकाळा शिवारातील एका विहिरीत फेकून दिले. तर मुलाला बेदम मारहाण करून त्याचा मृतदेह विहीरीजवळ फेकून दिला. हात बांधलेले असल्याने मुलीला विहिरीबाहेर पडता आले नाही.

ही बाब काही वेळाने उघडकीस येताच स्थानिकांनी या दोघांचाही शोध घेतला. त्यात रात्री उशिरा तरुणीचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. तर तरुणाचा मृतदेह सकाळी काही अंतरावर अढळून आला. घटनेनंतर मुलीच्या वडिलांसह काही नातेवाईकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच भोकरच्या अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी दशरथ पाटील, उमरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने घटनास्थळी दाखल झाले. संजीवनी आणि गोळेगाव येथील सुदेश कमळे यांचा विवाह एका वर्षापूर्वी झाला होता. संजीवनी ही दोन महिन्याची गर्भवती होती असे सांगण्यात आले. तिच्या पोटात असलेल्या बाळाचा व तिचा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Posts

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !
क्राईम

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!
क्राईम

उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

April 29, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

April 29, 2026
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

मध्यरात्री रेमंड चौफुलीवर भीषण धडक; अज्ञात वाहनाने कार चिरडली, दोघे गंभीर !

April 29, 2026
उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

उशिरा येणं महागात ; पोलिस अधीक्षक धिवरेंची थेट कारवाई, ३७ पोलिसांवर आर्थिक फटका!

April 29, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

रुग्णवाहिका उशिरा, जीव गेला आधीच; संतप्त जमावाचा आरोग्य केंद्रावर रौद्रावतार!

April 29, 2026
जाणून घ्या आजचा दिवस कसा जाईल तुमचा

नोकरी करणारे व्यस्त राहतील आणि कामाच्या दबावामुळे मानसिक ताण येऊ शकतो,

April 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group