जळगाव मिरर / १० एप्रिल २०२३
विवाह हा आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो या क्षणांसाठी अनेक लोक काय हौस करतील सांगता येत नाही अशीच एक हौस नवरीला चांगलीच महागात पडली आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडली असून काही वेळेतच सोशल मीडियावर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा व्हायरल झाल्याने नवरीवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. हि घटना घडताच मंडपात आलेले वऱ्हाडी पळतच सुटले.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील हाथरस मधील त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. लग्नातील त्या व्हिडिओमध्ये नवरीनं जे कृत्य केले आहे. त्यामुळे वऱ्हाडी मंडळींना तर मोठा धक्काच बसला आहे. लग्नानंतर त्या नवरी मुलींन हातात बंदूक घेत हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे उपस्थित असणाऱ्या पाहुण्या मंडळींची धावपळ सुरु झाली. अनेकांनी याबाबत आश्चर्यच व्यक्त केले आहे. हा काय प्रकार आहे हे त्यांना न कळाल्यानं मोठा गोंधळ निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. नवरी मुलीनं हवेत दणादण गोळीबार करण्यास सुरुवात केली. तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं त्याची जास्त चर्चा झाली आहे.
In UP's Hathras, a groom sat with "kato toh khoon nhi" face next to the bride. pic.twitter.com/i7iNqiMIP4
— Piyush Rai (@Benarasiyaa) April 9, 2023
त्या नववधूचे नाव जयमाला असे असून तिनं हातात बंदूक घेऊन अचानक हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लग्नाला आलेले पाहूणे हा सारा प्रकार पाहातच राहिले. आपण नक्की लग्नातच आलो आहोत की, आणखी कुठे असा त्यांना प्रश्न पडल्याचे दिसून आले. गोळ्यांचा आवाज ऐकून काही जणांनी त्या लग्नातून पळ काढला. या घटनेची पोलिसांनी तातडीनं दखल घेतली असून त्या मुलीवर गुन्हाही नोंदवला आहे.
पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून ते आता नवरीच्या शोधात आहे. नवरी मुलगी फरार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याविषयी अधिक माहिती देताना पोलीस म्हणाले की, संबंधित मुलीचा आम्ही शोध सुरु केला आहे. त्या मुलीनं फायरिंगसंबंधी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार असेही सांगण्यात आले आहे.
