जळगाव मिरर | १६ ऑक्टोबर २०२३
राज्यात नुकतेच नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे. मात्र त्यापूर्वीच ग्राहकांची निराशा करणारी एक बातमी समोर आली आहे. सलग एक आठवड्याच्या काळानंतर आजही सोन्या-चांदीचे भाव दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे सणासुदीच्या काळात होणे खरेदी करताना नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. आज सोन्याचे भाव दुपटीने वाढले असून चांदीच्या किमतींमध्ये देखील वाढ झाली आहे. त्यामुळे लवकर सोने 60 च्या असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
शनिवारी Good Returns नुसार, सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे. 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,400 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,440 रूपये असा सुरू आहे. MCX नुसार, 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 54,010 रुपये अशी सुरू आहे. तर 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 58,920 रुपयांनी व्यवहार करत आहे. थोडक्यात, आज सराफ बाजारातील सोन्याचे भाव वाढले आहेत.
22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 55,400 रुपये
मुंबई – 55,400 रुपये
नागपूर – 55,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)
पुणे- 60,440 रूपये
मुंबई – 60,440 रूपये
नागपूर – 60,440 रुपये
ग्राहकांना आज चांदीच्या किमतीतील दिलासा मिळालेला नाही. शानिवारी, 10 ग्रॅम चांदीचा भाव 741 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम चांदीचा भाव 7,410 रुपये सुरू आहे. 1000 ग्रॅम चांदीचा भाव 74,100 रुपयांनी सुरू आहे. चांदीच्या आजच्या भावात देखील +15, +150, +1500 अशा फरकाने वाढ झाली आहे.
आजचे प्लॅटिनमचे भाव आपण पाहिला गेलो तर त्यामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. 10 ग्रॅम प्लॅटिनमची किंमत 23,580 रुपयांनी व्यवहार करत आहे. तर 100 ग्रॅम प्लॅटिनमचा भाव 2,35,500 असा सुरू आहे. आज ऐन सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीच्या किमती वाढल्यामुळे ग्राहकांची मोठी निराशा झाली आहे.