जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२५
शहरातील पिंप्राळा हुडको येथील ज्ञानसाधना प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक मा. अमजदभाई रंगरेज उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
कार्यक्रमास शाळेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष बंडुदादा काळे, माजी नगरसेवक आबासाहेब कापसे, सचिव रोटेसर ज्ञानदेव काळे, मुख्याध्यापिका छाया भोळे, राजश्री महाजन, ऊर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका शगुफ्ता मिस, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी — तमनामिस, अफजल सर, नाजिम सर, फईम सर, जरीना मॅडम, मोहसीन सर, मुसददीक सर, साकीब सर, फरान सर, मोहतसीम सर, विकम सर, भैया वाघ, नानाभाऊ ठाकूर यांची उपस्थिती लाभली. शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतं, भाषणं व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्याचा गौरव व्यक्त केला. पालकवर्गाने देखील या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आयोजन अतिशय शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी पद्धतीने पार पडले.




















