जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२४
विवाह नोंदणी साईटवरून जळगाव शहरातील एका ३७ वर्षीय घटस्फोटीत महिलेची माहिती घेत तिच्याशी लग्न करून सहा लाख रूपये उकळणाल्या धक्कादायक प्रकार मंगळवार दि. ३० जुलै रोजी रात्री ११ वाजता समोर आला आहे. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, विवाह नोंदणी साईटवरून घटस्फोटीत महिलांची माहिती घेत पंकज रमेश पाटील याच्यासह, त्याची आई रंजना रमेश पाटील, रमेश माधव पाटील, प्राजक्ता अमित डेंगाणे व अमित डेंगाणे सर्व राहणार (रा. ओव्हळ, जि. पालघर) या पाच जणांनी जळगावातील एका भागात राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची माहिती घेतली. तिच्या मुलांनाही संभाळण्याचे आश्वासन देत पंकज पाटील याने या महिलेशी फेब्रुवारी २०२४ मध्ये लग्न केले. त्यानंतर या महिलेची सहा लाख रुपयांमध्ये फसवणूक करीत तिचा शारिरीक व मानसिक छळ केला.
जळगावातील महिलेशी लग्न केल्यानंतर तिला समजले की, त्याची एक पत्नी जिवंत असताना इतर चार महिलांशीही त्याने लग्न केले आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पिडीत महिलेने मंगळवार दि. ३० जुलै रोजी रात्री ११ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, त्यावरून वरील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात असला आहे. पुढील तपास सपोनि कल्याणी वर्मा करीत आहेत.