जळगाव मिरर / ३१ जानेवारी २०२३
महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना नाशिक जिल्ह्यात घडली आहे. नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका विधवा महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी तोंडाला काळ फासून गळ्यात चपलांचा हार घालत गावातून धिंड काढली. आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय या महिलेने व्यक्त तर दुसरीकडे याच महिलेवर संशय व्यक्त केला जात होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या चांदवड तालुक्यातील शिवरे गावात दहा दिवसांपूर्वी या महिलेच्या पतीने गळफास लावून आत्महत्या केली होती. मात्र, आपल्या पतीने आत्महत्या केली नसून त्यांचा घातपात झाला आहे, असा संशय या महिलेने दशक्रिया विधीच्या दिवशी उपस्थित केला. मात्र या महिलेचे दुसऱ्या व्यक्तीशी अनैतिक संबंध होते म्हणूनच तीच्या पतीने आत्महत्या केली असा तीच्या सासरच्या मंडळींनी आरोप केला आहे. सदर महिला पतीच्या दशक्रिया विधीसाठी आल्यानंतर तीच्या वरील त्याच राग अनावर झाला.
याच कारणावरून या महिलेला तिच्या सासरच्या लोकांनी तोंड काळ करून चपलाचा हार घालत गावात तिची धिंड काढली. असा परस्पराविरोधी आरोपातून हा घटनाक्रम घडला असून प्रशासकीय पातळीवर याची दखल घेतली गेली आहे. नाशिक जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक स्वतः या ठिकाणी जाऊन आढावा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सदर महिलेचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याने तिच्या पतीने आत्महत्या केली असा आरोप तिच्या सासरच्यांनी तिच्यावर केला होता. दरम्यान महिलेच्या पतीच्या आत्महत्या प्रकरणी वडनेरभैरव पोलिसांनी संशयित म्हणून महिलेच्या प्रियकरास अटक केली आहे. सध्या संशयित न्यायालयीन कोठडीत आहे.