
जळगाव मिरर | १० मार्च २०२६
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त खान्देश युनियन एज्युकेशन सोसायटी संचलित कै. गि. न. चांदसरकर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यामंदिर, साने गुरुजी कॉलनी, जळगाव येथे मंगळवार, दि. १० मार्च २०२६ रोजी प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या शिक्षणप्रेमी आणि समाजसुधारक कार्याबद्दल माहिती सांगितली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सावित्रीबाई फुले यांचे कार्य व योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली. भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सावित्रीबाई फुले यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी केलेले कार्य आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्याम ठाकरे यांच्यासह जयश्री पाटील, स्वप्निल भोकरे, पुनम पाटील, शारदा चौधरी, दीपिका सोनवणे, रोहिणी निकम, उज्वला भामरे, सुनिता पाटील, मनीषा वाघ, प्रिया कोपरकर व भूषण अमृतकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















