जळगाव मिरर | ४ नोव्हेबर २०२४
राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांनी देखील अर्ज दाखल केले आहे. मात्र आज माघारीची अंतिम दिनांक असल्याने मात्तब्बर उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे.
जळगाव विधानसभा मतदार संघासाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये तगडी लढत असली तरी या दोन्ही उमेदवारांची धाकधूक अपक्ष उमेदवारांनी वाढविली आहे. यंदाच्या विधानसभा मैदानातून अपक्ष उमेदवार माघार घेणार का यावर जळगाव विधानसभेची गणित ठरणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत एकूण ३६ उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यातून काही उमेदवार आज माघार घेणार असल्याचे समजते आहे. मात्र मात्तब्बर उमेदवारांच्या पराभवाचा चंग काही अपक्ष उमेदवारांनी बांधला आहे. त्यामुळे यंदाच्या मैदानातून अपक्ष माघार घेणार नाही असे जर चित्र असले तर विजयाचे गणित यंदा बदलू शकते.
विधानसभेच्या मैदानात यांची होवू शकते तगडी लढत !
जळगाव शहर विधानसभा मतदार संघासाठी महायुतीच्या भाजपतर्फे विद्यमान आ.सुरेश(राजूमामा) भोळे, महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे माजी महापौर जयश्रीताई सुनील महाजन, अपक्ष उमेदवार माजी उपमहापौर डॉ.अश्विन शांताराम सोनवणे, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, माजी नगरसेवक मयूर कापसे या पाच उमेदवारांपैकी कुणीही माघार घेण्यास तयार नसल्याचे चित्र सध्या तरी आहे.