जळगाव मिरर / ११ एप्रिल २०२३
जळगाव येथील हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानतर्फे आज दि.११ रोजी स्त्री शिक्षणाचे उदगाते महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमातविद्यार्थ्यांना महात्मा फुले जयतीनिमित्त त्याच्या जीवनावर आधारित व त्यांनी लिहिलेले पुस्तक वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सुमित्र अहिरेसर,अतुल चौधरीसर हे होते. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते एड रविंद्र गजरे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकला या नंतर सुमित्र अहिरे सरांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आज आपल्या बहुजन महापूरूषांना व त्यांचे विचार समजणे गरजेचे आहे त्यांनी त्यांचं सर्वस्व आयुष पणाला लावून समाज उद्धारासाठी रक्ताचे पाणी केले त्यांचा संघर्षातून आपण आज त्यांची जयंती साजरी करत आहोत असे प्रतिपादन अहिरे सरांनी केले यावेळी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान चे कार्याधक्ष्य मा.संदीप पाटील यांनी उपस्थीत प्रमुख मान्यवरांचे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात केले याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रतिष्ठानचे सदस्य विजय सुरवाडे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मा संदीप पाटील व विजय सुरवाडे यांनी परिश्रम घेतले.
