जळगाव मिरर | २१ मे २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासून अल्पवयीन मुलीसह महिलांवर अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. आज पुन्हा एकदा १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह रहायला आहे. गेल्या ६ महिन्यापूर्वी यावल तालुक्यातील एका तरुणाने या मुलीशी मैत्री करीत तिला प्रेमाच्या जाळ्यात टाकून वारवार लग्नाचे आश्वासन देत तीन ते चार वेळा सहा महिन्यात जबरदस्ती अत्याचार केले त्यानंतर लग्नास नकार देत समाजात तुझी बदनामी करेल अशी धमकी दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीने रावेर पोलिसात धाव घेत एका तरूणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले हे करीत आहे.