• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगाव एलसीबीने केला दरोडेखोराचा थरारक पाठलाग : आरोपी जेरबंद !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 17, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जळगाव एलसीबीने केला दरोडेखोराचा थरारक पाठलाग : आरोपी जेरबंद !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ जून २०२५

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने एका थरारक पाठलागानंतर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या आणि गोवंश चोरी केलेल्या आरोपीला जेरबंद केले. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून चोरीचा बैल आणि दरोड्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलीस अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हा यशस्वी ऑपरेशन राबविण्यात आले अशी अशी माहिती पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सविस्तर वृत्त असे कि, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील १५ जून रोजी रात्री ११ ते १६ जून रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान पथक भुसावळ व मुक्ताईनगर उपविभागात गस्त घालत असताना मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हद्दीतील कुंड गावात एका इनोव्हा कारमधून चार संशयित व्यक्ती एका घराजवळ दरोड्याच्या तयारीत उतरताना दिसले. पोलिसांची गाडी दिसताच ते पुन्हा इनोव्हामध्ये बसून भरधाव वेगाने डोलारखेडा फाट्यावरून नागपूर महामार्गाकडे पळू लागले.

नाकाबंदीदरम्यान इनोव्हा कार बंद पडताच, त्यातील तीन आरोपी व चालक सीटशेजारी बसलेला एक इसम दरवाजे उघडून पळून गेले. मात्र, इनोव्हा कारचालक अरबाज खान फिरोज खान (वय २३, रा. खदान, हैदरपुरा, अकोला) याला पोलिसांनी जागीच ताब्यात घेतले. या झटापटीत स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव पथकातील पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना किरकोळ मुका मार लागला आहे.

पोलिसांनी तात्काळ इनोव्हा कारचा पाठलाग सुरू केला. वाहन थांबवण्याचा इशारा देऊनही इनोव्हा थांबली नाही, उलट चालकाने शासकीय वाहनाला कट मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. जळगाव नियंत्रण कक्षाला याची माहिती देऊन मलकापूर, नांदुरा, बुलढाणा, अकोला येथील पोलीस दलांना वाहन थांबवण्याबाबत कळवण्यात आले. १६ जून रोजी पहाटे ३.४० च्या सुमारास अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील रिधोरा शिवारात, अकोला शहरातील डिव्हिजन गस्तीवरील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ठलअक कार्यालयाजवळ नागपूर-धुळे महामार्गावर ट्रक आडवे लावून नाकाबंदी केली. येथे इनोव्हा कार हळू झाली आणि बंद पडली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोउपनिरीक्षक अनिल जाधव, पोहेकॉ दर्शन ढाकणे, सफौ रवी नरवाडे, पोहेकॉ सुनील दामोदरे, विजय पाटील, अक्रम शेख, पोना श्रीकृष्ण देशमुख, पोहेकॉ भरत पाटील यांच्यासह जुने शहर पोलीस स्टेशन अकोला येथील पोउपनिरीक्षक रवींद्र करणकर, पोहेकॉ प्रमोद शिंदे आणि पोकों स्वप्नील पोधाडे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक जळगाव यांनी संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group