जळगाव मिरर | १२ डिसेंबर २०२३
जून्या वादातून खून केल्यानंतर मारेकरी पसार झाले. यातील एक संशयित नंदूरबारच्या दिशेने गेल्याची माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने या संशयित सोनू आढाळे याच्या नंदूरबार येथील विसरवाडी येथून ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरातील अरुण सोनवणे या तरुणाला टोळक्याने चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करुन निघुण खून केला. खून केल्यानंतर मारेकरी तेथून पसार झाले होते. एलसीबीचे तीन पथक तयार करुन तपासकामी रवाना केले. यातील एका पथकाला खूनातील संशयित सोनू आढाळे हा नंदूरबारच्या दिशेने गेला आहे. तसेच तो तेथून गुजरातमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तात्काळ एलसीबीच्या पथकाने संशयित सोनू आढाळेच्या नंदूरबारमधील विसरवाडी येथून ताब्यात घेतले. पथक जळगावला येण्यासाठी रवाना झाले असून रात्री उशिरा त्याला अटक केली जाणार आहे. खून केल्यानंतर पाचही संशयित जळगावातून पसार झाले. त्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे तीन पथक रवाना झाले आहे. या पथकांकडून या संशयितांचा शोध घेतला जात असून पथक त्यांच्या मागावर आहे.