जळगाव मिरर | २२ फेब्रुवारी २०२४
गेल्या ६ वर्षांपासून छत्रपती संभाजी नगर येथील एका तरुणाचे जळगाव शहरातील एका तरुणीशी प्रेम प्रकरण सुरु होते. मात्र प्रेयसीने अचानक फोन बंद केल्याने तरुणाचा प्रेमभंग झाला त्यामुळे तरुणाने थेट जळगाव गाठत तरुणीचा शोध घेण्याचा प्रयन्त केला मात्र तरुणी त्याला मिळून न आल्याने प्रेमभंग झालेल्या तरुणाने थेट रेल्वे रुळावर जात जीवनयात्रा संपविण्याच्या निर्णय घेतला मात्र सुदैवाने त्याने ११२ नंबर ला हि माहिती दिली असता जळगाव शहर पोलिसांनी त्याचा जीव वाचविला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका मुलीच्या फोनवर छत्रपती संभाजी नगर येथील तरुणाचा राँग नंबरने फोन येऊन या मुलीशी चर्चा झाली असता त्यांचे यातून प्रेम प्रकरणाची सुरवात झाली हे प्रेम प्रकरण ६ वर्ष चालु असताना प्रेयसीने अचानक बोलने बंद केल्यामुळे तो छत्रपती संभाजी नगर येथील तरुण जळगाव येथे तरुणीचा शोध घेण्यासाठी आला असता त्याला तरुणीचा शोध लागला नसल्यामुळे तरुण पिंप्राळा रेल्वे रुळ गाठला काही वेळ रेल्वेची प्रतीक्षा केल्याने रेल्वे येत नसल्याने त्याने दिनांक १७ फेब्रुवारी रोजी डायल ११२ यांना कॉल करुण मी आत्महत्या करीत आहे माझी बॉडी घ्यायला या असे कळविले त्यावरुन तात्काळ डायल ११२ चे कार्यालयाने सदरचे घटना स्थळ शहर पो.स्टे. चे हददीत असल्याने जळगाव शहर पो.स्टे.चे डायल ११२ डयुटी कामी नेमलेले पोलीस अमलदार यांना कळविले त्यावरुन ते तात्काळ घटनास्थळी पोहचले व त्या तरुणाचा जीव वाचविला तसेच त्यास पो.स्टे.ला आणुन समुपदेशन केले.
यांनी बजावली कामगिरी
सदरची कामगीरी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते,उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पो.स्टे.चे पो. नि. अनिल भवारी, सहा.पो.नि. कल्याणी वर्मा, पो.ना. चद्रकांत सोनवणे, पो.कॉ. दिपक पाटील व डायल ११२ चे सहा. फौ. सुनिल पवार, पो.कॉ. चेतन ढाकणे यांनी केली आहे.