जळगाव मिरर | २८ डिसेंबर २०२३
जळगाव ग्रामीण तालुक्यातील शिरसोली प्र बो येथील तरुणांनी दिनांक २८ रोजी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा कार्यालयात येथील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. देशाचे यशस्वी प्रंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला भारतीय जनता पार्टी आगामी काळात संघटन वाढवण्याचे काम करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर व विधानसभा समन्वयक प्रभाकर आप्पा सोनवणे यांनी तरुणांना पक्षाची रचना आणि स्वरूप विषयी मार्गदर्शन व स्वागत केले. जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील जळकेकर व विधानसभा समन्वयक प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिरसोली येथील अजय खलसे, ज्ञानेश्वर अस्वार, सुमित अस्वार, सोपान वराडे, मयूर धनगर, अमोल बारी, अविनाश बारी, शुभम गायकवाड, कुणाल बारी, कृष्णा बारी, गणेश बारी, भूषण बारी, भूषण काटोले, कृष्णा नाईक, कनैय्या ढेंगळे, किरण माळी यांनी प्रवेश केला.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष गोपाल भंगाळे, जिल्हा चिटणीस मनोहर पाटील, तालुका सरचिटणीस अरुण सपकाळे, भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब पाटील, गिरीश वराडे रामचंद्र धनाजी पाटील उमाळा सरपंच योगेश खडसे ग्रामपंचायत सदस्य फकीरा पाटील महेश पाटील कैलास पाटील जगन राठोड अधिक कार्यकर्ते उपस्थित होते.