जळगाव मिरर | १६ जुलै २०२५
शहरातील आर. आर.विद्यालयातील इयत्ता नववीमध्ये शिकणाऱ्या कल्पेश वाल्मिक इंगळे (वय १५, रा. रचना कॉलनी) या विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कल्पेशच्या वर्गशिक्षकांसह मुख्याध्यापक व इतर सहा शिक्षकांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहे. त्यानंतर मंगळवारी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी यांची चौकशी करुन त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, शहरातील आर. आर. महाविद्यालयात मधल्या सुट्टीत जेवण केल्यानंतर त्याचे वर्गमित्रासोबत वाद झाले. या वादात वर्गमित्राने मारहाण केल्यामुळे तो खाली फरशीवर पडून त्याचा मृत्यू झाला असल्याचे कल्पेशच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणी सोमवारी आर. आर. शाळेचे मुख्याध्यापक, कल्पेशच्या वर्गशिक्षीका यांच्यासह त्याला शाळेतून हॉस्पिटलमध्ये घेवून जाणाऱ्या शिक्षक अशा एकूण २ महिला आणि चार पुरुष शिक्षकांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदविण्यात आले होते.
मंगळवारी संस्थेचे अध्यक्ष अरविंद लाठी यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. त्यानुसार त्यांची तपासधिकारी उपनिरीक्षक गोपाल देशमुख यांची चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांनी ज्यावेळी मला फोन आला, त्यावेळी संस्थेचा अध्यक्ष या नात्याने मी लागलीच हॉस्पिटलमध्ये पोहचले. परंतु त्यापुर्वीच डॉक्टरांनी कल्पेशचा ईसीजी काढून त्याला मयत घोषीत केले होते. याबाबत मी कल्पेशच्या पालकांना सांगून त्याला जिल्हा रुग्णालयात घेवून जाण्याबाबत सांगितले. तसेच शिक्षकांना विद्यार्थ्यांचे डबे तपासण्याच्या देखील सूचना केल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले.




















