जळगाव मिरर | १० डिसेंबर २०२३
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटनेपासून लांब असतांना तोच एक धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी या गावात सख्या मुलाने आपल्या बापाच्या डोक्यात लोखंडी पावड्याने हल्ला करून खून केल्याची घटना दि.९ डिसेंबर रोजी शनिवारी सकाळी ९ वाजता शेंदुर्णी येथील तरंगवाडी परिसरात घडली. या घटनेत नाना दामू बडगुजर (वय ८२) असे मयत वडिलांचे नाव असून खून करून पसार झालेला मुलगा कैलास बडगुजर याला शनिवारी रात्री पाचोरा येथे अटक करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तरंगवाडी शिवारात नाना दामू बडगुजर यांचे शेत होते. शनिवारी सकाळी नाना बडगुजर व मुलगा कैलास बडगुजर (४५, रा. वाडी दरवाजा, शेंदुर्णी) दोन्ही शेतात होते यावेळी शेतीवरून त्यांच्यात वाद झाला. या दरम्यान कैलास याने पिता नाना यांच्या डोक्यात कुट्टी भरण्याचे लोखंडी पावडे टाकले. यात नाना हे खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
कैलास याचा मुलगा विशाल आणि त्याची पत्नी हे दुसऱ्या शेतात काम करीत होते. तेही तिथे पोहोचले. विशाल याने वडिलांच्या हातातील पावडे हिसकावून जखमी आजोबांना सावरण्याचा प्रयत्न केला. ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे पाहून आरोपीने शेतातून पळ काढला. विशाल बडगुजर (२३) याच्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल झाला.