
जळगाव मिरर | ७ जानेवारी २०२४
सध्याच्या युगात देशातील तरुण तरुणी प्रेमात काय करून बसतील हे कुणीही सांगू शकत नाही देशात गेल्या काही वर्षापासून तरुणीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत नियमित वाढ होत असतांना तरुणांना व तरुणीना प्रेमाची व्याख्या समजाविणे फार महत्वाचे झाले आहे. याच प्रेमाची व्याख्या जया किशोरी यांनी आपल्या शब्दात सांगितली आहे.
जया किशोरी म्हणाल्या की, प्रियकरला सोडता येते, पण त्याचे शब्द विसरता येत नाही. श्री कृष्णापासून वेगळ्या झाल्यानंतर गोपींनीही सांगितले होते की कान्हाला सोडू शकतो पण कान्हाचे शब्द विसरता येत नाही. कान्हा आजूबाजूला नाही हे सहन करू पण त्याच्याबद्दल बोलू नका, हे कसे शक्य आहे. त्यावरच आम्ही जिवंत आहोत, असे गोपांचा उदाहरण देत जया किशोरी प्रेमात फसवणूक झालेल्या प्रेमीयुगुलांसाठी काही सल्ले दिले आहेत ते जाणून घेऊयात.
जया किशोरी म्हणाल्या, अशा लोकांनी जी व्यक्ती कधीही बदलत नाही तिचा आधार घ्यावा. पण त्याचवेळी प्रश्न पडतो की जग की देव या दोघांपैकी कोणाचा आधार घ्यावा? त्यासाठी लोकांनी जगाचा आश्रय घेऊ नका आणि देवाचा आश्रय घ्यावा, कारण देव कधीही बदलत नाही.
जया किशोरी म्हणाल्या की, प्रेम म्हणजे निस्वार्थीपणा त्यात कशाचाही स्वार्थ नसावा, त्यासाठी कोणतेही कारण नसावे आणि कोणत्याही गोष्टींचा अर्थ नसावा. दोन व्यक्तींमध्ये काही कारणास्तव प्रेम असेल, त्या प्रेमातला अर्थ हरवला तर प्रेमही संकटात येते. अशा नात्यात स्वार्थ पाहिला जातो आणि काम पूर्ण होईपर्यंतच प्रेम असते.
देवाने सुंदरतेच्या मागे धावू नका असा धडा दिला कारण राक्षस वासनांध होऊन मोहिनी रूपाच्या मागे लागले आणि अमृत विसरले. जो केवळ सौंदर्याचा पाठलाग करतो तो अमृत सोडतो. अमृत म्हणजे गुण, म्हणून गुणांच्या पाहून प्रेम करावे कारण सौंदर्य फार काळ टिकत नाही. असे जया किशोरी सांगतात.
जया किशोरी म्हणाल्या की, आपल्या प्रियजनांशी नेहमी विचारपूर्वक बोलले पाहिजे, कारण जर तुम्ही इतर व्यक्तींसोबत विचार करून बोलत असाल तर प्रियजनांशी का नाही? असा विचार करा आणि प्रियकरासोबत बोला.