जळगाव मिरर | २२ ऑक्टोबर २०२४
राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती तिसऱ्या आघाडीची यादी जाहीर झाली आहे. यात 8 जणांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
यावल – रावेर विधानसभा मतदार संघातून प्रहार जनशक्ती पक्षाने अनिल चौधरी यांना उमेदवारी जाहीर केली असून अनिल चौधरी यावल रावेर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. काँगेस पक्षाकडून विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांचे पुत्र धनंजय चौधरी तर भाजपा कडून माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे पुत्र अमोल जावळे हे उमेदवार मैदानात आहेत. अनिल चौधरी यांच्या उमेदवारीने यावल रावेर विधानसभा मतदार संघात तिरंगी लढत होईल हे निश्चित तिसऱ्या आघाडीत प्रहार जनशक्ती पक्षाचे 4, महाराष्ट्र राज्य समितीला 2, स्वतंत्र भारत पक्षाचा 1, स्वाभीमानी शेतकरी पक्षाचा 1 असे एकूण ४ जणांची उमेदवारी जाहीर झाली आहे.