देशभरातील अनेक तरुण तरुणी बेरोजगार असून त्यांना नोकरीबाबतची एक मोठी बातमी समोर आली आहे. आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या जिओमध्ये तरुणांना करिअरची संधी मिळत आहे. जिओने तरुणांसाठी फ्रीलान्स वर्कची संधी उपलब्ध करुन दिली आहे.
विशेष या पदासाठी नवशिके, नवीन उमेदवारांना पण संधी आहे. ते पण या पदासाठी अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. त्यासाठी मोठे दिव्य करण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाईन अर्ज करु शकता. तो कसा करायचा, काय कागदपत्रे द्यायची यासंबंधीची माहिती जाणून घ्या…
जिओसोबत फ्रीलान्स करिअर
Jio Career वर फ्रीलान्सर जॉबसाठी अर्ज करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा
सर्वात अगोदर Jio Career चे संकेतस्थळ https://careers.jio.com/ वर जा
यानंतर फ्रीलान्सर हा पर्याय निवडा. त्यावर क्लिक करा. याठिकाणी अनेक जॉबचे पर्याय मिळतील
तुमच्या आवडीचा नोकरी निवडा
त्यानंतर नोकरीची सविस्तर माहिती घेण्यासाठी त्यावर क्लिक करा
नोकरीसाठी अर्ज करा, या पर्यायावर क्लिक करा
तुमचा रिझ्युम आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
आता सबमिट बटणावर क्लिक करा
या एक चांगला पर्याय आहे. यामध्ये तुमच्या गुणवत्ता आणि शैक्षणिक पात्रतेनुसार तुम्ही नोकरी शोधू शकता. तुम्ही 10 वी पास असाल अथवा पदवीधर असाल तुमच्यासाठी नोकरी उपलब्ध आहे. तुमचा अर्ज Jio Career टीम द्वारा तपासण्यात येईल. तुमचा अर्ज मंजूर झाला तर एक ईमेल येईल. त्यानंतर पुढील प्रक्रियेची माहिती देण्यात येईल.