जळगाव मिरर / ३१ जानेवारी २०२३
येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लीड शाखा जळगाव शहरची वर्ष २०२३ ची कार्यकारिणी नुकत्याच झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. नूतन शाखा कार्याध्यक्षपदी कल्पना शिरीष चौधरी यांची तर प्रधान सचिवपदी गुरुप्रसाद पाटील यांची फेरनिवड करण्यात आली आहे. शहर शाखेच्या इतिहासात जवळपास पहिल्यांदाच कार्याध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर महिलेची निवड झाली आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा जळगाव शहरची बैठक नुकतीच घेण्यात आली. बैठकीमध्ये निरीक्षक म्हणून जिल्हा प्रधान सचिव विश्वजीत चौधरी उपस्थित होते. बैठकीमध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये करावयाची नियोजित कामे तसेच जोडीदाराची विवेकी निवड संवाद शाळा, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प अभ्यासक्रम शाळा शाळांमध्ये राबविण्याविषयी प्राथमिक नियोजनाबाबत चर्चा झाली. यानंतर सर्वानुमते जळगाव शहर शाखेची कार्यकारिणी निवड करण्यात आली.
कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी उद्योजक यशवंत बारी तर उपाध्यक्षपदी माध्यमिक शिक्षक अजित चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्ष म्हणून माध्यमिक शिक्षिका कल्पना शिरीष चौधरी, प्रधान सचिव म्हणून गुरुप्रसाद पाटील यासह विविध उपक्रम विभाग कार्यवाह हेमंत सोनवणे, बुवाबाजी विभाग कार्यवाह देविदास सोनवणे, वैज्ञानिक जाणीव प्रकल्प कार्यवाह प्रा. कल्पना दिलीप भारंबे, युवा सहभाग कार्यवाह जितेंद्र धनगर यांची निवड करण्यात आली. बैठकीत आगामी नियोजनाबाबत चर्चा झाली. याप्रसंगी शिरीष चौधरी, जितेंद्र धनगर, कल्पना चौधरी, मीनाक्षी चौधरी, इंद्रजीत धनगर आदि उपस्थित होते.