जळगाव मिरर | २७ जुलै २०२४
देशातील अनेक शहरातून गुन्हेगारीच्या अनेक घटना उघडकीस येत असतांना नुकतेच एका २४ वर्षीय तरुणीची हत्या करण्याच्या आल्याची घटना बंगळुरू शहरात घडली आहे. ही घटना 23 जुलैची असून त्याचे सीसीटीव्ही फुटेज आता व्हायरल झाले आहे. ज्यामध्ये आरोपी रात्री 11 वाजता मुलीच्या पीजीमध्ये पोहोचल्याचे दिसत आहे. दरवाजा ठोठावून तिला बाहेर काढले. यानंतर त्याने गॅलरीत चाकूने हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने दोन मिनिटांत मुलीवर 20 वार केले, त्यानंतर तिचा गळा चिरून पळ काढला. आवाज ऐकून पीजीमध्ये राहणाऱ्या इतर मुली बाहेर आल्या; मात्र कोणीही मदत केली नाही. त्यानंतर मुलीचा तेथेच मृत्यू झाला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख अभिषेक अशी झाली आहे. त्याने मारलेल्या मुलीचे नाव कृती आहे. ती बिहारची रहिवासी होती. पोलिसांनी आरोपीला मध्य प्रदेशातील भोपाळ येथून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कृतीच्या रूममेटचा प्रियकर असून तो बेरोजगार आहे. अभिषेकचे अनेकदा त्याच्या मैत्रिणीसोबत रूममध्ये भांडण होत होते. भांडण वाढले की कृती हस्तक्षेप करायची. याचा राग अभिषेकला आला. सूत्रांनी सांगितले की, कृतीने तिच्या रूममेटला अभिषेकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. यामुळे आरोपीला राग आला आणि त्याने कृतीची हत्या केली.