अमळनेर : विक्की उत्तम जाधव
येथील मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे मंगळग्रह मंदिर येथे मकर संक्रांति निमित्त मंदिरातील गाभाऱ्यात पतंगांची सजावट करण्यात आली. विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी भाविक गर्दी करीत होते. मकर संक्रांत हा भारतातील पौष महिन्यात येणारा एक शेती संबंधित सण आहे. भारतीय संस्कृती ही कृषी संस्कृती आहे.
या दिवसात शेतात आलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात हरभरे, ऊस,बोरे, गव्हाच्या ओंब्या, तीळ अशा गोष्टी सुपडात भरून त्या देवाला अर्पण करतात. महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करतात. यास भोगी, संक्रांत व क्रिकांत अशी नावे आहे. संक्रांतीस आप्तस्वकीयांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून तिळगुळ घ्या गोड बोला असे सांगून शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी जप, तप, दान, श्राद्ध, तर्पण आदी धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व आहे. याप्रसंगी दिलेले दान शतपटीने वाढते आणि त्याचे फळ मिळते अशी श्रद्धा आहे. या दिवशी अनेक भाविक मंगळग्रह मंदिरात येऊन दर्शन घेत असतात.