जळगाव मिरर | २४ ऑक्टोबर २०२४
चोपडा शहरात एका दुचाकीस्वाराकडून ३० लाखांची रोख रक्कम पोलिसांनी रात्री उशिरा हस्तगत केली आहे. गुटखा विक्री करण्याच्या संशयावरुन संबंधितावर ही कारवाई केल्यानंतर त्याजवळ मोठ्या प्रमाणात ही रकम आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे, तर दुसऱ्या घटनेत अमळनेर तालुक्यातील चोपडाई नाक्यावर सुरु असलेल्या वाहन तपासणीत एका वाहनातून १६ लाख ३८ हजारांची रोख रकम आढळून आली आहे. तर, ही रक्कम एका कापूस व्यापाऱ्याची असल्याचे सूत्रांनी सांगितले
मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा शहरात चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब घोलप यांनी २३ रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास केलेल्या कारवाई एका दुचाकी स्वाराकडे ३० लाखांची रोकड सापडल्याची माहिती स्थतः आण्णासाहेब घोलप यांनी दिली आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. परंतु, या दुचाकीस्वाराकडून सापडलेली रोकड ही नेमकी कुणार्थी होती, आणि कुठल्या कामासाठी तो घेऊन जात होता, त्याचाच तपास रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याचे डीवायएसपी आण्णासाहेब घोलप यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणी दुचाकी स्वारास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अजय पाटील याला ताब्यात घेतले असून तो यामहा कंपनीच्या एफझेड या दुचाकी (एमएच १९ डीवाय-७९९३) ने ही रकम घेऊन जात होता. या वेळी पोलिसांनी अवैध गुटखा घेऊन जात असल्याच्या संशयावरुन त्याला अडवले असता, त्याच्याकडे असलेल्या पिशवीत ही रकम आढळून आल्याचे पत्रकारांना डीवायएसपी घोलप यांनी सांगितले. या कारवाईमुळे मात्र चोपडा शहरासह तालुक्यात रात्री उशिरा चांगलीच खळबळ उडाली असन चर्चा सरु असल्याचे दिसन आले.
तर अमळनेर तालुक्यातील चोपडाई येथे एसेसटी तपासणी पथकाने चोपडा येथील एका वाहनांची तपासणी केली असता त्यात १६ लाख ३८ हजाराची रोख रक्कम आढळून आली. पोलीस निरीक्षक विकास देवरे, सहाय्यक उपनिरीक्षक रामकृष्ण कुमावत, अमोल पाटील, जितेंद्र निकुंभे, पञ्चक प्रमुख आर. डी. सोनवणे, सचिन पाटील, बुद्धभूषण जाधव हे वाहने अडवून तपासणी करत होते, या वेळी चोपडा येथील राज फायबर जिनिंगचे हितेश विनोदलाल लाड यांचे वाहन (एमएच – १९. जीएक्स-७५००) मध्ये १६ लाख ३८ हजार रुपये पोलिसांना आढळून आले. ही गाडी चोपडा तालुक्यातील विरवाडे येथील जितेंद्र भोजु कोळी हा चालक ही रक्कम घेऊन जात होता. ही रक्कम पीयूष राजेंद्र जैस्वाल या व्यापाऱ्याच्या कापसाची असल्याचे सांगण्यात आले. पथकाने ही रक्कम उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासमक्ष तहसील कार्यालयात पंचनामा करून जप्त केली आहे. दरम्यान, ही रक्कम दहा लाखांच्या वर असल्याने ती आयकर विभागाकडे पाठवण्यात येणार आहे.