• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 1, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२६ 

अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) तस्करीला मोठा हादरा दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ६२.०७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा घातक अमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून तब्बल ₹३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच तपासादरम्यान मालेगाव येथील एका पुरवठादाराचाही सहभाग उघड झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन), सेक्टर क्रमांक ए-१४ समोरील रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान हयात खान (वय ३६) असे असून तो मूळचा आडगाव (ता. जळगाव) येथील रहिवासी असून सध्या एमआयडीसी परिसरातील करीमनगर, फातिमा नगर येथे वास्तव्यास आहे. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला एमडी हा रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.

या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ३९.०६ ग्रॅम एमडी (किंमत ₹१.९६ लाख), ११ प्लास्टिक पिशव्यांमध्ये ९.१० ग्रॅम एमडी (किंमत ₹३६ हजार) आणि १८ प्लास्टिक पिशव्यांमध्ये १३.९१ ग्रॅम एमडी (किंमत ₹५६ हजार) असा एकूण ६२.०७ ग्रॅम एमडी, ज्याची किंमत ₹२.८८ लाख आहे, जप्त केला. याशिवाय एक रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन (₹२० हजार) आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (₹५० हजार) असा एकूण ₹३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहायक पोलीस फौजदार अतुल रघुनाथ वंजारी यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.

Related Posts

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !
जळगाव

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद
क्राईम

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026
पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !
क्राईम

पावसाच्या सरींमध्ये तांबापुरात अग्नितांडव; शॉर्टसर्किटमुळे तीन दुकाने जळाली !

August 1, 2026
सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू
क्राईम

सूडाच्या भावनेतून मेहुण्यावर दगडाने हल्ला; उपचारादरम्यान मृत्यू

August 1, 2026
अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त
क्राईम

अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये गांजाची तस्करी उधळली; ४ लाखांचा मुद्देमाल जप्त

July 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

कोट्यवधींची कामे, तरी शहर पाण्याखाली; मुख्य अभियंत्यांच्या निवासस्थानातही पाणी !

August 1, 2026
मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

मुसळधार पावसाने खचला पाळधी-तरसोद बायपास; वाहतूक तातडीने बंद

August 1, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

एलसीबी-एमआयडीसी पोलिसांचा एमडी तस्करीवर घणाघात; एक जेरबंद, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त !

August 1, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

खंडणीसाठी रचला सैतानी डाव; दुचाकीत एमडी ठेवून नातेवाईकाला अडकविण्याचा प्रयत्न

August 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group