जळगाव मिरर | ३१ ऑगस्ट २०२३
जळगाव शहरातील महामार्गालगत इच्छादेवी चौफुली ते अंजिठा चौफुली दरम्यान असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळून दि.29 रोजी मालट्रक चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तीन संशयित आरोपीना ताब्यात घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महामार्गालगत इच्छादेवी चौफुली ते अंजिठा चौफुली दरम्यान असलेल्या रत्नाकर नर्सरी जवळून दि.29 रोजी रात्री मेहरुण परिसरातील संतोषी माता नगरातील रहिवासी वसीम अहमद सुलतान अहमद यांच्या मालकीची 7 लाख 50 हजार रुपये किमतीची टाटा कंपनीची मालट्रक क्रमांक एम एच 19 सी.वाय 5310 ही कोणीतरी अज्ञात इसमांनी चोरुन नेली होती. म्हणुन सदर बाबतीत सैय्यद अशपाक सैय्यद निसार अली, रा- जाकीर हुसैन सोसायटी, गणेशपुरी, मेहरुण जळगाव यांनी फिर्याद दिल्यावरुन अज्ञात ईसमाविरुध्द एमआयडीसी पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सदरची मालट्रक ही चाळीसगांव रोड पोस्टे धुळे यांनी पकडली होती व सदरची मालट्रक चोरणा-या 01) नवाज सादिक सैय्यद, वय 31 वर्षे, रा. साईबाबा मंदीराजवळ, तांबापुरा जळगाव, 02) शहजाद रशीद शेख, वय 22 वर्षे, रा. रामरहिम कॉलनी जवळ,सेधवा (मध्यप्रदेश), 03) अवेजखान जहागीरखान, वय 21 वर्षे, रा. ईस्लामपुरा, गरीब नवाज नगर, नशिराबाद जळगाव अशांना ताब्यात घेतले होते तेथुन त्यांचा ताबा एमआयडीसी पोस्टेने घेतला असुन त्यांना अटक करण्यात येवुन त्यांना आज रोजी न्यायमुर्ती श्रीमती सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता मा.न्यायालयाने 03 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिली आहे.
यांनी केली कारवाई
एमआयडीसी पोस्टेचे पोलीस निरिक्षक श्री जयपाल हिरे, सफौ.अतुल वंजारी, ईम्रान सैय्यद, जमील शेख, सुधीर साळवे, निलोफर सैय्यद, सचिन पाटील, साईनाथ मुंढे, तसेच चाळीसगांव रोड धुळे पोस्टेचे पोलीस निरिक्षक श्री धिरज महाजन, पोहेकॉ / एस सी पाथरवट, ए.व्हि वाघ, अशांनी केली असुन सदर आरोपीकडुन अजुन मालट्रक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.