• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home Uncategorized

अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2026
in Uncategorized
0
अटलांटा प्रकरणात न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश : आरोपींना अटकपूर्व जामीन; मात्र देशाबाहेर जाण्यास बंदी
Share on FacebookShare on Twitter

नगरसेवक अरविंद देशमुख यांच्या तक्रारीनंतर प्रकरणाला वेग

जळगाव मिरर | ८ मे २०२६ 

जळगाव महानगरपालिकेच्या कोट्यवधी रुपयांच्या कथित आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित अटलांटा प्रकरणात जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश देत आरोपी राजहू ए. बॅरोट यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. मात्र न्यायालयाने जामीन मंजूर करताना कठोर अटी घालत आरोपींना न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय देशाबाहेर जाण्यास स्पष्ट मज्जाव केला आहे. तसेच तपास अधिकाऱ्यांना राहत्या पत्त्याची व मोबाईल क्रमांकाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणात जळगाव महानगरपालिकेची बाजू अधिक ठामपणे समोर येत असून सार्वजनिक निधीचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप अभियोजन पक्षाने न्यायालयात मांडला. महानगरपालिकेच्या वतीने सादर करण्यात आलेल्या युक्तिवादात अटलांटा लिमिटेड कंपनीला १९९६-९७ ते २००१-०२ या कालावधीत विविध रस्ते व पायाभूत सुविधा विकास कामांसाठी मोबिलायझेशन अॅडव्हान्स व मटेरियल अॅडव्हान्स देण्यात आला होता. मात्र मोठ्या प्रमाणावर निधीची वसुली बाकी राहिली असून व्याज व दंडासह तब्बल ४२ कोटी ६० लाख ७६ हजार ५६२ रुपये इतकी रक्कम महानगरपालिकेकडे येणे बाकी असल्याचे न्यायालयात मांडण्यात आले.
या प्रकरणाला सुरुवातीपासूनच नगरसेवक अरविंद देशमुख यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अटलांटा कंपनीविरोधात फौजदारी स्वरूपाची तक्रार सर्वप्रथम जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करून या विषयाला कायदेशीर दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण काम अरविंद देशमुख यांनी केले होते. महानगरपालिकेच्या पैशांचा प्रश्न हा जनतेच्या कष्टाच्या कररुपी पैशांशी संबंधित असल्याने दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी सातत्याने लावून धरली होती. महासभा, माध्यमे आणि प्रशासकीय स्तरावरही त्यांनी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला होता.

यानंतर महानगरपालिका प्रशासनानेही या विषयाची गंभीर दखल घेत सरकारी स्तरावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. विशेष लेखापरीक्षण अहवालात नमूद करण्यात आलेल्या अनियमितता, अपूर्ण कामे, तसेच निधी वापराबाबत उपस्थित झालेल्या संशयामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले.

न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रथमदर्शनी हा वाद करार व आर्थिक व्यवहारांशी संबंधित असल्याचे नमूद केले असले तरी, तपास सुरू ठेवण्यास कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट केले. संपूर्ण प्रकरण दस्तऐवजी पुराव्यांवर आधारित असल्याने आरोपींना तपासात सहकार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

अटकपूर्व जामीन मंजूर झाला असला तरी आरोपींना देशाबाहेर जाण्यास बंदी, पुराव्यांमध्ये छेडछाड न करण्याचे आदेश, तसेच तपास अधिकाऱ्यांनी बोलावल्यास हजर राहण्याची सक्ती यामुळे अटलांटा प्रकरणातील तपासाची दिशा आणखी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Related Posts

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !
Uncategorized

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?
Uncategorized

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मुलाला वारंवार कामे?

September 24, 2026
पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !
Uncategorized

पहाटे घरातून निघाला अन् थेट रेल्वे रुळावर गेला : तरुणाचा दुर्देवी मृत्यू !

September 18, 2026
जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल  !
Uncategorized

जळगावातील पाच प्रमुख मार्गांच्या दुरुस्तीसाठी मनपाचा बांधकाम विभागाला आदेश ; नगरसेविकेच्या तक्रारीची दखल !

September 4, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Uncategorized

यावलमध्ये १४ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा आरोप; स्मशानभूमी परिसरात नेल्याची धक्कादायक घटना

September 3, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!
Uncategorized

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या छात्रसंघ व सिनेट निवडणुकीत अभाविपचा ९ पैकी ९ जागांवर विजय!

September 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

चार दिवसांपासून बेपत्ता प्रौढाचा विहिरीत आढळला मृतदेह!

October 10, 2026
बँकेतून फोन आल्यास सावधान : जळगावात झाली महिलेची फसवणूक !

पाचोऱ्यात भरदिवसा २.१५ लाखांची चोरी : वृद्ध शेतकऱ्याला लुटून चोरटे पसार !

October 10, 2026
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले

अल्पवयीन मुलं सुरक्षित का ? जळगावातून अल्पवयीन मुलीसह मुलगा बेपत्ता !

October 9, 2026
अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

अवैध वाळू साठा प्रकरणात मोठी कारवाई : कानळदाच्या मंडळ अधिकारी निलंबित

October 9, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group