• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला ; जागीच मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शेतात काम करणाऱ्या वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला ; जागीच मृत्यू, परिसरात भीतीचे वातावरण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑगस्ट २०२५

जळगाव तालुक्यातील देवगाव शिवारात सोमवारी (दि. ४ ऑगस्ट) दुपारी भीषण घटना घडली. गिरणा धरणाजवळील शेतात काम करत असलेल्या ७३ वर्षीय इंदुबाई वसंत पाटील (रा. देवगाव) या वृद्धेवर बिबट्याने अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या इंदुबाई यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सदर घटना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. इंदुबाई पाटील या नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करत असताना बिबट्याने त्यांच्या डोक्यावर व चेहऱ्यावर जबरदस्त चावा घेतला. त्या गंभीर जखमी अवस्थेत शेतातच कोसळल्या. त्याचवेळी शेजारी काम करणारे बाळू पुना पाटील व रमेश पौलाद सोनवणे यांच्या लक्षात ही घटना आली. त्यांनी तात्काळ पोलीस पाटील व त्यांच्या नातेवाइकांना माहिती दिली. घटनास्थळी बिबट्याचे पावलांचे ठसेही आढळून आले. माहिती मिळताच तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि वनविभागाचे नितीन बोरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. इंदुबाई यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेमुळे देवगावसह परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group