अमळनेर : विक्की उत्तम जाधव
पाडळसे धरणासाठी जानवे येथे हळदीच्या समारंभात वधू- वर आणि वऱ्हाडी मंडळींनी देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावे धरणासाठी पत्र लिहून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
जनआंदोलन समितीच्या माध्यमातून शेतकरी, विद्यार्थी, मजूर आणि सामान्य नागरिकांना धरणाला निधी द्या अन्यथा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देणारी ५१ हजार पत्र लिहिली आहेत. त्यांनतर जानवे येथील माजी सरपंच भटू पाटील यांचे सुपुत्र शुभम पाटील व श्रीराम देवरे यांची कन्या गायत्री यांनी पाडळसे धरणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नावे पत्र लिहिले. यासाठी रवींद्र पाटील( कोकोकोला सर) यांचे मार्गदर्शन लाभले.