जळगाव मिरर । २७ जानेवारी २०२३ ।
सध्याच्या काळात सर्वत्र लहान मुल आपल्या अभ्यासात तर ज्येष्ठ मंडळी आपल्या सततच्या कामात व्यस्त असतात, पण आपण कुठेतरी लहान मुलांना जे हवे आहे ते खेळातील प्रकार हिरावून घेतोय का ? असा आपण विचार कधी केलाय का पण तो विचार केला पाहिजे. आजपासून २० वर्षाआधी जे खेळ तुम्ही खेळले असाल ते खेळ तुमचे मुल खेळतात का ? मुलांचा शारीरिक विकास तसेच बुद्धीचा विकास होण्यासाठी हे खेळ खूप महत्वाचे आहे. त्यामुळे तुमचे बालपण नक्कीच हरवले असेल व तुम्हाला तुमच्या मुलांचे बालपण हरवायचे नसेल तर तुम्ही या कार्यक्रमात नक्की सहभागी होवू शकतात.
जळगावातील जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (JITO) लेडीज विंग तर्फे जैन स्पोर्टस अकॅडमी व युवाशक्ती फाऊंडेशनच्या सहकार्याने “हॅप्पी स्ट्रिट या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पत्रकार परिषदेत नीता जैन, शीतल जैन, सुलेखा लुंकड, स्वाती जैन, मोना चोरडिया, कविता भंडारी, विराज कावडीया यांनी यावेळी माहिती दिली.
जळगाव येथे जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन लेडीज विंग तर्फे जैन स्पोर्टस अकॅडमी व युवाशक्ती फाऊंडेशनच्या सहकार्याने “हॅप्पी स्ट्रिट या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन दि. २९ जानेवारी २०२३ रविवार रोजी सकाळी ६.३० ते १०.३० वाजे दरम्यान काव्यरत्नावली चौक करण्यात आले आहे. यामध्ये योग, झुंबा, बॅडमिंटन, बुद्धीबळ, लुडो, कॅरम, बास्केटबॉल, रस्सीखेच, तायक्वांदो, स्केटींग, चित्रकला, विनामूल्य आरोग्य तपासणी (BMI व बोन डेन्सीटी तपासणी), आरोग्यवर्धक खानपानाचे स्टॉल्स, टॅटू, सायकलींग, नृत्य, मल्लखांब इ. विषयांचा समावेश यामध्ये आहे. या आयोजनासाठी प्रेम कोगटा, महेंद्र रायसोनी, जितेंद्र कोठारी, एवन बागरेचा, प्रदिप जैन, लखीचंद जैन यांचे अनमोल सहकार्य लाभणार आहे.
या कार्यक्रम सर्व जळगवाकर नागरिकांसाठी खुले असून ५ वर्षापासून ते ९० वर्षांपर्यंतचे नागरिक यामध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांचा आनंद घेऊ शकतात. या ठिकाणी सहभागी होणाऱ्या नागरिकांमधून लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी तसेच मानवी आयुश्यात क्रीडा प्रकाराचे महत्त्व कळावे यासाठी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही क्षण कुटुंबासह घालविण्यासाठी तसेच कुटुंबातील सदस्यांसोबत वार्तालाभ बाहाक आयोजनामागील उद्देश आहे. सदर कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारची नोंदणी अथवा नोंदणी फी आकारण्यात आली नसून ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांना थेट कार्यऊन सहभाग घ्यावयाचा आहे. या हैप्पी स्ट्रिट मध्ये सहभागी होण्याचे आवाहन जळगाव जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय महेश्वरी, श्री सकल जैन संघ जळगाव चे संघपती दलिचंद जैन, जैन इरिगेशन सिस्टम्स लि. चे अध्यक्ष अशोक जैन यांनी चित्रफितीच्या माध्यमाने केले आहे. जळगावकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात यामध्ये सहपरिवार सहभागी होऊन या मनोरजनात्मक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.