जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२३
गेल्या काही वर्षापासून सोशल मिडीयावर अनेक प्रेम जुळले आहे काही प्रेम यशस्वी झाले तर काही प्रेमात नको ते झाले. मात्र एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका तरुणीची मैत्री इंस्टाग्रामवर एका तरुणासोबत झाली त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करीत बळजबरीने गर्भपात केला. मात्र, गावी जाऊन दुसऱ्याच तरुणीशी लग्न केले. प्रियकराचे लग्न झाल्याची माहिती मिळताच प्रेयसीने बलात्कार झाल्याची तक्रार पोलिसात केली. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी युवकास अटक केली. राघवेंद्र ऊर्फ राज राधेश्याम यादव (31,एमआयडीसी) असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबाझरीत राहणारी 23 वर्षीय तरुणी पदवीचे शिक्षण घेत आहे. तिची इंस्टाग्रामवरून राज यादवशी ओळख झाली. तो वाहतूक व्यावसायिक आहे. दोघांनी एकमेकांचे भ्रमणध्वनी क्रमांक घेतले. दोघांचे नेहमी बोलणे होत होते. त्यानंतर त्यांच्या भेटी व्हायला लागल्या. राजने 1 मार्च 2021 मध्ये तिला वाढदिवस असल्याचे सांगून घरी नेले. तेथे वाढदिवसाचा कोणताही कार्यक्रम नव्हता. राजने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्यावर बलात्कार केला. तिने मैत्री तोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राजने तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. तिच्या आईवडिलांची भेट घेऊन लग्न लावून देण्याबाबत बोलणे केली. त्यानंतर तो वारंवार तिला घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. तसेच होणारा पती असल्याचे सांगून तरुणीच्या घरीही तिचे लैंगिक शोषण करीत होता.
जानेवारीत तो मूळ गावी बिहारमध्ये गेला. तेथे त्याने दुसऱ्याच तरुणीशी लग्न उरकून टाकले. त्याने पत्नीला बिहारला ठेवून एकटाच नागपुरात आला. गेल्या काही दिवसांपासून तरुणीला घरी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. त्यातून ती गर्भवती झाली. तिला गर्भपात केल्यानंतर लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यामुळे तिने खासगी रुग्णालयातून गर्भपात केला. गेल्या महिन्याभरापूर्वी राज यादवची पत्नी नागपुरात राहायला आली. प्रियकराने गुपचूप लग्न उरकून घेतल्याची माहिती मिळताच तरुणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात बलात्कार झाल्याची तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून राजला अटक केली.