जळगाव मिरर | २१ ऑक्टोबर २०२४
अनेक ठिकाणी प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हेगारीच्या घटना घडत असतांना नुकतेच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आंध्र प्रदेशमधील बडवेल येथे सतत लग्नाचा तगादा लावल्यामुळे प्रियकराने अल्पवयीन मुलीला पेट्रोल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जे. विग्नेश असे आरोपीचे नाव आहे. तो पीडित मुलीला लहानपणापासून ओळखत होता. त्याने या मुलीसोबत काही महिन्यांपूर्वी नाते तोडले होते. त्यानंतर त्याने दुसऱ्या महिलेसोबत विवाह केला. मात्र, मुलीने त्याच्यामागे लग्नाचा तगादा लावला. त्याने तिला बडवेलजवळच्या कारखान्याजवळ भेटायला बोलाविले. दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्याने तिच्यावर पेट्रोल ओतले आणि पेटवून दिले. विग्नेश फरार असून त्याचा शोध सुरु आहे.