जळगाव मिरर | १० नोव्हेबर २०२३
महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आज दुपारी देखील एक भीषण अपघात झाला आहे. कासा- डहाणू राज्य मार्गावरील वधना येथे खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या मॅजिक आणि मालवाहू गाडीमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच जागीच मृत्यू झाला आहे. तर ७ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना लागलीच उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, कासा – डहाणू दरम्यानच्या राज्य महामार्गावर वळण रास्ता असल्याने हा अपघात झाला आहे. वळण रस्ता असल्याने दोन्ही वाहनांवरील चालकांचा ताबा सुटल्याने एका वळणावर समोरासमोर धडकून हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचा चक्का चूर झाला. या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून ७ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आलिया आहे. जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालय तसेच डहाणू ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी डहाणू पोलीस दाखल झाले डहाणू कासा महामार्गावर सूचना फलकांचा अभाव आणि धोकादायक असलेली वळण त्यामुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागासह पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.