मेष : आर्थिकविषयक महत्त्वपूर्ण निर्णयांचे सकारात्मक परिणाम होतील. नातेवाईकांच्या प्रकृतीसंदर्भातील काळजी कमी होईल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरेल. तुमच्या उर्जेचा सकारात्मक वापर करा. चुकीच्या गोष्टींमध्ये आपला वेळ वाया घालवू नका. नकारात्मक विचार टाळा. तुमच्या योजना आणि कार्य प्रणाली गुप्त ठेवा. कुटुंबात सुख-शांती कायम राहील. आरोग्य चांगले राहील.
वृषभ : आज तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण होऊ शकते. दुपारनंतर ग्रहस्थिती अनुकूल राहील. या वेळेचा पुरेपूर फायदा घ्या. सकारात्मकता आणि संतुलित विचाराने नियोजनबद्ध पद्धतीने कामे पूर्ण होतील. जवळची व्यक्ती तुमच्या समस्येचे कारण असू शकते. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिक पातळीवर निर्णय घ्या. मशीन किंवा कारखान्याशी संबंधित व्यवसायात फायदेशीर उपक्रम सुरू होतील. घराच्या व्यवस्थेवरून पती-पत्नीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.
मिथुन : अनेक दिवसांपासून रखडलेलं काम आज कोणाच्या तरी सहकार्याने पूर्ण होईल. यामुळे तुम्हाला मोठा दिलासा मिळेल. मुलांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करा. शेजारी किंवा बाहेरील लोकांशी वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्या. जवळचा प्रवासही टाळलात तर बरे होईल. कार्यालयातील कर्मचारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने रखडलेली कामे पुन्हा सुरू करता येतील. पती-पत्नीचे नाते उत्तम राहील. आरोग्य चांगले राहील.
कर्क : आज काही महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी काळ अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात. तुमची उर्जा योग्य दिशेने वळवा. सकारात्मकतेने आणि संतुलित विचारसरणीमुळे उपक्रम नियोजित पद्धतीने पार पडतील. अहंकारावर नियंत्रण ठेवून संयमाने परिस्थिती हाताळल्यास यश मिळेल. व्यावसायिक कामे सामान्य राहतील. जोडीदाराच्या तब्येतीची चिंता राहील.
सिंह : आज तुमच्या विशेष कार्याची समाजात आणि कुटुंबात प्रशंसा होईल. सर्व कामे पद्धतशीरपणे आणि एकोपा ठेवल्यास यश मिळेल, असे श्रीगणेश सांगतात. भावनेच्या आहारी जावून घेतेला निर्णय हानिकारक ठरेल. घरामध्ये बांधकामाशी संबंधित काम रखडण्याची शक्यता. ऑनलाइन कामे सुरळीतपणे पार पडतील. पती-पत्नीच्या नात्यात गोडवा येईल. पचण्यास हलका आहार घ्या, शिळे अन्न टाळा.
कन्या : आज सद्यस्थिती समजून घेवूनच भविष्यातील योजनांवर चर्चा करा. कुटुंबातील शिस्त कायम राहण्यासाठी काही महत्त्वाचे नियम बनवा. दुपारनंतर परिस्थिती थोडी अधिक अनुकूल होईल. विचारपूर्वक खर्च करा. अन्यथा तुम्हाला पश्चाताप होईल. व्यावसायिक कामे सामान्य राहतील. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. आरोग्य चांगले राहील.
तूळ : आज तुम्हाला नेहमीच्या धावपळीतून थोडा फुरसतीसाठी वेळ मिळेल. तरुणांनी त्यांच्या भविष्याचे नियोजन करावे. आर्थिक व्यवहारत करताना काही शंका असतील. मित्राबाबत जुना वाद शांतपणे सोडवताना रागावर नियंत्रण ठेवा. व्यावसायिक कामे पूर्वीप्रमाणे सुरू राहतील. कुटुंबात धार्मिक कार्य पूर्ण होऊ शकते.
वृश्चिक : आज तुमचा दिवस व्यस्त असू शकतो. जवळच्या नातेवाईकांबरोबर संवाद साधाल. आर्थिक स्थिती ठीक राहील. एखाद्या गरजू मित्राला मदत करावी लागेल. चिडचिडेपणा तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करु शकतो. व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पुन्हा विचार करणे आवश्यक आहे. व्यस्तता सोडून कुटुंबासोबत थोडा वेळ घालवल्यास आनंद मिळेल. अतिश्रमामुळे थकवा येऊ शकतो.
धनु : आज तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. हा निर्णय तुमची आर्थिक स्थिती सुस्थितीत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरेल. धार्मिक आणि सामाजिक कार्यातही रुची वाढेल. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. जवळचा मित्र किंवा नातेवाईक त्रासाचे कारण ठरु शकतात. मनोरंजनासोबतच तुमच्या वैयक्तिक कामांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. व्यावसायिक कामाच्या पद्धतीत काही बदल होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. दिनचर्या आणि आहाराकडे लक्ष द्या.
मकर : आज मालमत्तेसंदर्भातील खरेदी करार अंतिम होऊ शकतो. संधी सोडू नका. घरासाठी आरोग्याशी संबंधित वस्तूंची ऑनलाइन खरेदीचा विचार कराल. इतरांवर अवलंबून न राहता तुमच्या कामावर अधिक लक्ष द्या. आज कोणत्याही प्रकारचे कर्ज देऊ नका. मुलांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज असेल. चुकीच्या गोष्टींकडे लक्ष न देता तुमच्या वैयक्तिक समस्या सोडवा. आरोग्य चांगले राहिल.
कुंभ : आज दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी केली तर दिवस चांगला जाऊ शकतो, असे श्रीगणेश सांगतात. कोणतीही अचानक लाभाची योजना कौटुंबिक चर्चा करूनही करता येईल. काही काळापासून सुरू असलेली चिंताही दूर होऊ शकते. आळसामुळे कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. कोणतीही अशुभ बातमी तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम करेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे. परिश्रमाच्या जोरावर आर्थिक स्थिती सुलभ ठेवाल. कौटुंबिक आनंद कायम राहील. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारी जाणवतील.
मीन : आज कंटाळवाण्या दिनचर्येपासून मुक्त होण्यासाठी तुमच्या आवडीच्या कामांमध्ये वेळ घालवा, असे श्रीगणेश सांगतात. तुमच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. खराब आर्थिक स्थितीमुळे तुमचे लक्ष काही वाईट कामांकडे आकर्षित होऊ शकते. अशावेळी स्वत:ला सकारात्मक कार्यात व्यस्त ठेवा. घरातील छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुमची दिनचर्या तुम्हाला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी ठेवू शकते.