जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२४
राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आमरण उपोषणाला अंतरवाली सराटी गावात बसले आहेत. आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत आज काही प्रमाणात खालवली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी तीन दिवसापूर्वी आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यांनी दोन दिवस पाणीही न घेतल्याने त्यांची तब्येत खराब झाली आहे. तसेच त्यांनी आता डॉक्टरांना तपासणी करण्यास देखील नकार दिला आहे.
मागील सहा महिन्यातील मनोज जरांगे पाटील यांची आंदोलन करण्याची ही तिसरी वेळ आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक मराठा बांधव अंतरावाली सराटीमध्ये उपस्थित आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा बांधवांना दिलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेसाठी सरकार सरकरच विशेष अधिवेशन बोलावणार असल्याचं बोललं जात आहे.