जळगाव मिरर | २६ डिसेंबर २०२३
शहरातील रोझलँड इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या अध्यक्षा रोझमीन खिमानी प्रधान यांची मुलगी सानिया प्रधान यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या टीम यूएसएचे सदस्य लिली विंटर, शाड ब्यूकॅनन, अलिसा बुकमायर, सानिया प्रधान,ओगान सेल्स यांनी जैन उद्योग समुह संचालित अनुभूती निवासी शाळेस सदिच्छा भेट देऊन तेथील विद्यार्थ्यां समवेत ख्रिसमसचा आनंद लुटला.
शाळेच्या विद्यार्थ्यांनी ख्रिसमस निमित्त विशेष सजावट सह छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी ख्रिसमस ची गाणी म्हटली.एकमेकांना नाताळ च्या शुभेच्छा दिल्या टीम यु एसए च्या सर्व सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ख्रिसमस ची सविस्तर माहिती दिली तसेच जळगांव ला येण्याचा उद्देश कथन केला.यानंतर शाळेच्या ग्रंथालयास भेट देत तेथील विविध प्रकारची ग्रंथसंपदा पाहताना सविस्तर वाचन केले. यानंतर संगीत विभागास भेट देत तबला वादनाचे प्रात्यक्षिक केले. टीम यू एस ए चे अनुभूती शाळेच्या वतीने विक्रांत जाधव यांनी स्वागत केले व शाळेच्या वाटचाल व प्रगतीची माहिती दिली. रोजमिन खिमानी यांनी भेटीच्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल संचालिका निशा जैन यांचे आभार मानले.