जळगाव मिरर | २६ जून २०२३
जळगाव शहरात कत्तलीसाठी आणलेल्या ५५ गुरांची सुटका एमआयडीसी पोलिसांनी केली असून यात आठ संशयितांना ताब्यात घेतले असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एमआयडीसी पोलिसांनी लेलॅण्ड वाहन (एम.एच.19 सी.वाय.2330), छोटाहत्ती (एम.एच.47 ई.3014) व महेंद्रा बोलेरो पिकअप वाहन जप्त करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मास्टर कॉलनी, कुरेशी मोहल्ला, पिरजादे वाडा, अक्सा नगर मेहरुण भागात काही चोरीचे पशूधन वाहनात अवैधपणे कोंबून ते कत्तलीसाठी नेले जात असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना कळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. मेहरुण परीसरातील मास्टर कॉलनीत पहिली कारवाईची मोहीम राबवण्यात आली. या कारवाईत एऊ लाख 94 हजार रुपये किमतीच्या 15 बैलांची सुटका करण्यात आली. या कारवाईत शेख राजीक शेख रफिक, शेख रेहान शेख युसूफ कुरेशी (वरणगाव), अदनान कय्युम खान (दत्तनगर, मेहरुण जळगाव), इफ्तेखार शरीफ खान (रा.मास्टर कॉलनी, जळगाव), सरफराज रहीम शेख (मास्टर कॉलनी, जळगाव), सैय्यद वाजीद सैय्यद इब्राहीम (रथ चौक, जुने जळगाव) व सैय्यद अनीस सैय्यद हमीद मन्यार (रा. मन्यार मोहल्ला मेहरुण जळगाव) आदींना अटक करण्यात आली.
दुसर्यरा कारवाईत अक्सा नगर, मेहरुण जळगाव येथे पत्र्याच्या शेड मध्ये असरार शेख मुक्तार शेख, एक अल्पवयीन व सत्तार शेख (रा अक्सा नगर, मास्टर कॉलनी मेहरुण जळगाव) यांच्या ताब्यातून तीन लाख 10 हजार रुपये किंमतीचे 40 बैल हस्तगत करण्यात आले. हे बैल चोरीचे असल्याचा संशय असून असरार शेख मुक्तार यास अटक करण्यात आली. तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही कारवाई दरम्यान एकूण पाच लाख 4 हजार रुपये किंमतीचे पशूधन जप्त करण्यात आले. एमआयडीसी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, प्रदीप पाटील, रामकृष्ण पाटील, राजेंद्र कांडेलकर, दीपक चौधरी, पोना, सचीन पाटील, योगेश बारी, ईमरान सेव्यद, किशोर पाटील, किरण पाटील, मंदार पाटील, चेतन पाटील, आशा पांचाळ आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.