जळगाव मिरर / २१ फेब्रुवारी २०२३ ।
राज्यातील शिंदे गटाचे आमदार असलेल्या मुलांची दादागिरी प्रंचड व्हायरल होवू लागली आहे. मुंबईतील चेंबूर भागात लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान गायक सोनू निगमला धक्काबुक्की झाली आहे. सोनू निगमसोबत सेल्फी काढण्याच्या नादात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने मारहाण केली. या घटनेनंतर सोनू निगमने सोमवारी रात्री उशिरा पोलीस ठाणे गाठून आमदारांच्या मुलाविरूद्ध गुन्हा दाखल केला. आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
चेंबूर फेस्टिव्हलच्या फिनालेदरम्यान ही घटना घडली. सोनू निगम गायन करत होते. पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्या मुलाने आधी सोनूच्या मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केले. त्यानंतर सोनू निगम स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने आधी गायकाच्या अंगरक्षकाला धक्काबुक्की केली आणि नंतर सोनूलाही धक्काबुक्की केली. डीसीपी हेमराज सिंह राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वप्नील फातर्पेकर असे मारहाण करणाऱ्याचे नाव आहे.
सोनू म्हणाला, गायनाचा कार्यक्रम संपल्यानंतर मी स्टेजवरून खाली येत असताना स्वप्नीलने मला पकडले. त्यानंतर त्याने मला वाचवण्यासाठी आलेल्या हरी आणि रब्बानी (दोन्ही सोनू सूदचे साथीदार) यांना धक्काबुक्की केली. मी पायऱ्यांवर पडलो. मी तक्रार दाखल केली आहे. जेणेकरून लोक बळजबरीने सेल्फी घेण्याचा आणि वाद घालण्याचा विचार करणार नाही. तिथे काही लोखंडी रॉड पडले असते तर रब्बानी यांचा मृत्यू झाला असता. तिला अशाप्रकारे ढकलले गेले.