जळगाव मिरर | ३१ मे २०२३
धरणगाव तालुक्यातील एका गावातील ५५ वर्षीय महिलेचा एका डॉक्टराने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील पाळधी या गावी ५५ वर्षीय महिला रहिवासास आहे. दिनांक २५ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास महिलेने संशयित आरोपी डॉक्टर पाटील याला सांगितले की या ठिकाणी गाडी पार्किंग करू नका याचा राग आल्याने संशयित आरोपी डॉ.पाटील यांनी महिलेला अश्लील शिवीगाळ करीत मारहाण केली जर तु पोलिसात माझ्याविरोधात तक्रार दिली तर तुला व परिवाराला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देखील यावेळी दिली. या महिलेने पाळधी दूरक्षेत्र पोलिसात धाव घेत संशयित आरोपी डॉ.उत्पल्ल पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि.प्रमोद कठोरे हे करीत आहेत.