जळगाव मिरर | २७ ऑक्टोबर २०२३
माझ्यासोबत रिलेशन ठेवले नाही तर तुझ्या तोंडावर अॅसिड टाकून तुझा चेहरा विद्रूप करून टाकेल अशी १७ वर्षीय तरुणीला धमकी देत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना पारोळा शहरातील एका महाविद्यालयाच्या गेट जवळ घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरात १७ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि. २५ रोजी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास हि तरुणी घरात असतांना तिच्या घरासमोरून एक संशयित आरोपी तिला टाटा करण्याचा इशारा करून निघून गेला तर दि.२० रोजी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास हि तरुणी आपल्या मैत्रीणीसह वडिलाच्या दुचाकीने महाविद्यालयात गेली असता महाविद्यालयाच्या गेटजवळ देखील या संशयित आरोपीने तरुणीला तु माझ्याशी रिलेशन ठेव असे बोलला तर तरुणी त्याच्यावर रागवू लागली असतात. तिला तो म्हणाला कि, माझ्यासोबत रिलेशन ठेवले नाही तर मी तुझ्या तोंडावर अॅसिड टाकून तुझा चेहरा विद्रूप करून टाकेल अशी धमकी देत विनयभंग केला. या प्रकरणी तरुणीने पारोळा पोलिसात धाव घेत संशयित आरोपी विरोधात विनयभंग केल्या प्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोहेकॉ.प्रवीण पारधी हे करीत आहेत.