जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२३
श्रावण महिन्यात जळगाव शहरातील प्रत्येक शिव मंदिरात अनेक भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी रीघ लावलेली होती. त्यानंतर जळगाव शहरातून अनेक परिसरातून कावडयात्रा निघाल्या सर्वच शिवभक्तांनी या महिन्यात मोठा जल्लोष केला होता.
यावेळी जळगाव मनपाचे माजी उपमहापौर व नगरसेवक डॉ.अश्विन शांताराम सोनवणे यांनी शिव मंदिरातील भाविकांना रुद्राक्ष वाटप केले.
जळगाव शहरात नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले माजी उपमहापौर डॉ. अश्विन शांताराम सोनवणे यांच्यातर्फे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून ते नेहमीच चर्चेत असतात. यंदाच्या श्रावण महिन्यात देखील ते रुद्राक्ष वाटप करून ते चर्चेत आले आहे.
त्यांनी जळगाव शहरातील अनेक मंदिरात दर सोमवारी भेट देवून भाविकांना मध्यप्रदेश येथे पर्व काळात सिद्ध केलेले रुद्राक्ष वाटप करून भाविकांसाठी खास भेट दिल्याने अनेक भाविक प्रसन्न झाले होते.
एका महिन्यात तब्बल २० हजारापेक्षा जास्त रुद्राक्ष त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे. जळगाव शहरातील हे पहिले नगरसेवक असतील ज्यांनी हजारो रुद्राक्ष शिवभक्तांना दिले आहे.