जळगाव मिरर | २४ डिसेंबर २०२३
राज्यातील नाशिक येथून एक भीषण आग लागल्याची बातमी समोर आली आहे. मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात घरे आणि झोपड्याना भीषण आग लागल्याची घटना घडली असून यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग झपाट्याने पसरत गेल्यामुळे सुमारे 35 पेक्षा जास्त झोपड्या आणि घरे अगीच्या विळख्यात सापडून खाक झाले आहेत.
ही आग तब्बल 4 तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली असून या आगीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या आगीचे कारण अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. आग लागलेल्या या परिसरात छोटी वस्ती आणि लाकडांची घरे असल्याने एका घराला लागलेली आग काही सेकंदात सर्वत्र पसरली. अवघ्या काही मिनिटांत आग सर्वदूर पसरली. मालेगाव महापालिकेच्या आग्निशामक पथकाच्या जवांनानी 11 फेऱ्या मारत आग आटोक्यात आणली. यात अनेक कुटुंबांचे नुकसान झाले आहे. तसेच ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.